Helicopter crash site in Pune's Bavdhan Budruk area, where three people lost their lives. esakal
पुणे

Helicopter Crash in Pune: बापरे! ते हेलिकॉप्टर मुंबईत सुनील तटकरेंना घ्यायला जात होतं, त्यापूर्वीच मोठी दुर्घटना

Helicopter Crash in Pune Leaves Three Dead: सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अपघात कसा झाला, नेमकी कोणती चूक झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Sandip Kapde

पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना मुंबईत घ्यायला जात होतं, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राज्यभरातून या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईत ते सुतारवाडी असा प्रवास सुनील तटकरे करणार होते. त्यासाठी पुण्याहून मुंबईसाठी हेलिकॉप्टर जात होते. काल हे हेलिकॉप्टर परळीत होते.

अपघाताचे कारण-

दिल्लीस्थित एका कंपनीच्या मालकीचं हे हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिजॉर्ट येथील हेलीपॅडवरून उड्डाण करत होतं. पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. अपघात झाल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त क्षेत्रात बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. परंतु, या भीषण अपघातामुळे हेलिकॉप्टरमधील तीनही जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

डोंगराळ भाग आणि धुके अपघाताला कारणीभूत

प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, अपघाताचं मुख्य कारण धुके असल्याचं सांगितलं जात आहे. डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ते थेट खाली कोसळलं. या भागात काहीशा उंचावर ऑक्सफर्ड काउंटी रिजॉर्ट आहे, जिथे हेलीपॅडवरून हे हेलिकॉप्टर उडालं होतं. दुर्घटना झाल्याचं कळताच अनेक एजन्सी आणि बचाव पथकं तातडीने घटनास्थळी पोहोचली, परंतु त्याआधीच सर्वांच्या मृत्यूचे वृत्त आलं.

सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अपघात कसा झाला, नेमकी कोणती चूक झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT