पुणे

#Helmet  हेल्मेटसक्ती लांबणीवर

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी अचानक घेतलेल्या हेल्मेट सक्‍तीच्या निर्णयाबाबत पोलिसांनी एक पाऊल मागे घेतले आहे. सरकारी कार्यालयांच्या प्रमुखांना विश्‍वासात घेऊन आता एक आठवड्यानंतर हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

शहरात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्‍ती करण्याचा निर्णय पोलिसांनी जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवारपासून (ता. २०) विनाहेल्मेट सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.  

हेल्मेट सक्‍तीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. परंतु, अचानक कारवाई करण्याऐवजी सरकारी कार्यालयांच्या प्रमुखांना विश्‍वासात घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येईल.

हेल्मेटची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी साधारण एक आठवड्यानंतर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

पुणेकरांवर हेल्मेट सक्‍ती लादू नये
हेल्मेट सक्‍तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मंगळवारी हेल्मेट सक्‍तीविरोधी पुणेकर नागरिक कृती समितीची बैठक पार पडली. पोलिसांनी पुणेकरांवर हेल्मेट सक्‍ती लादण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत पालकमंत्री, सर्व आमदार आणि पोलिस आयुक्‍तांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. कृती समितीचे विवेक वेलणकर, अंकुश काकडे, शांतीलाल सूरतवाला, संदीप खर्डेकर, श्‍याम देशपांडे, संजय बालगुडे, शिवा मंत्री, रूपाली ठोंबरे पाटील, बाळासाहेब रुणवाल, ग्राहक पंचायतीचे पोरे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

शहरात पावलोपावली सिग्नल असल्यामुळे दुचाकीचा वेग कमी असतो. त्यामुळे अपघाताची शक्‍यता कमी असते. तसेच, पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे हेल्मेट बाळगणे अवघड होते. शहराच्या मध्यवर्ती भागाऐवजी शहरालगतच्या महामार्गांवर हेल्मेटसक्‍ती करावी. 
- ए. एम. खान, सरकारी कर्मचारी

हेल्मेटसक्ती पूर्णतः चुकीची आहे. सामान्य लोकांनी धुडकावून लावलेली ही सक्ती आता सरकारी कर्मचाऱ्यांवर लादली जात आहे. ही सक्ती करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करायला हवा. एखाद्याला मानेच दुखणे असेल तर त्याने काय करावे किंवा दुर्दैवाने हेल्मेटधारीचा अपघात होऊन ते डोक्‍यात अडकले तर ते कापण्यासाठी काही विशेष उपाययोजना आहेत का, हे देखील पाहिले पाहिजे.   
-सुनील सूर्यवंशी, कर्मचारी, अनुरेखन विभाग, कृषी आयुक्तालय

वाहतूक पोलिसांकडून आज नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू होती. सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्‍तीबाबत कारवाई सुरू केलेली नाही. हेल्मेट वापराबाबत सरकारी कर्मचारी सकारात्मक आहेत. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा

अगोदर सर्व पोलिसांनी हेल्मेट घातलेले जनतेला दिसू द्या. मगच हेल्मेट सक्‍ती करा. कारवाई करताना सामान्य नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखणार कसे?  अशा निर्णयामुळे जनता भरडली जात आहे.
 - विवेक वेलणकर,   हेल्मेट सक्‍तीविरोधी पुणेकर नागरिक कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT