Pune Loksabha By Election Esakal
पुणे

Pune Loksabha Bypoll Election: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून गोंधळाची स्थिती; राजकीय पक्षांमध्ये धांदल

पुणे लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यामुळे निवडणूक होणार नाही असा समज झालेल्या राजकीय पक्षांमध्ये धांदल उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यामुळे निवडणूक होणार नाही असा समज झालेल्या राजकीय पक्षांमध्ये धांदल उडाली आहे. पण लोकसभेची मुदत संपण्यास अवघे साडेपाच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक होणार की नाही यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.(Latest Marathi News)

खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. आयोगाने या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर उच्च न्यायालयाने या जागेवर पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, याबाबतचा आदेश बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे ही पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत शहरात दुपारनंतर चर्चेला उधाण आले होते.

लोकसभेची मुदत १९ मे २०२४ मध्ये संपुष्टात येत आहे. घटनेनुसार त्या आधी ही निवडणूक घेणे बंधनकारक आहे. तर आचारसंहितेचा कालावधी हा कमीत कमी ४५ दिवस असणे बंधनकारक आहे. त्यामुळे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीअखेर लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यास अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी राहिला आहे.

त्यामुळे या अडीच महिन्यांत पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करणे, आचारसंहितेसाठीचा कालावधी आदी गोष्टी विचारात घेतल्या तर पुणे लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होऊ शकत नाही, असा दावा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. केवळ पुणे लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा हा प्रश्‍न नाही, तर देशातील चार लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.(Latest Marathi News)

न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेतली तर विजयी उमेदवाराला काही दिवसांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जावे लागले. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिला असला, तरी सार्वत्रिक निवडणुकांसाठी राहिलेला कालावधी लक्षात घेता, ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव केला. त्याची धास्ती घेऊन सत्ताधारी भाजपने अनेक क्लृप्त्या लढवत लोकसभेची पोटनिवडणूक टाळली. अखेर न्यायालयानेच चपराक दिली आहे.

- मोहन जोशी, उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस

भाजपने आपल्या स्वार्थासाठी पुणेकरांना त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवून मोठे पाप केले आहे. याची शिक्षा त्यांना निश्चितच येत्या निवडणुकीत पुणेकर मतदार देतील.

- प्रशांत जगताप, अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

पोटनिवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा एक खासदार विजयी झाला असता तर संपूर्ण देशात तो मेसेज गेला असता, हे देखील निवडणूक टाळण्यामागचे एक कारण होते. परंतु आता न्यायालयाने भाजपला चपराक दिली आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक घेऊन दाखवावी.

- संजय मोरे, शहर प्रमुख, उद्धव गट

भाजपने पुणेकरांना गेल्या दीड वर्षापासून लोकनियुक्त खासदारापासून दूर ठेवले. शहराच्या विकासावरही त्यामुळे परिणाम झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये पुणेकर याचा जाब भाजपला विचारल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

- साईनाथ बाबर,

पुणे शहराध्यक्ष, मनसे

निवडणुका कधी घ्याव्यात, याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने पोटनिवडणूक तारीख कधीही जाहीर केली, तरी ती लढविण्याची तयारी भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपची घोडदौड सुरू आहे.

- धीरज घाटे,

पुणे शहराध्यक्ष, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT