पुणे

आयटीचा आलेख उंचावता

सुधीर साबळे

पिंपरी - आयटी कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी उंचावत आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नव्या कंपन्यांमध्ये दरवर्षाला दहा टक्‍के वाढ होत असल्याचे समोर आले आहे. 

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनकडे तीन वर्षांपूर्वी ३७ कंपन्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या वर्षी हा आकडा ८८ पर्यंत जाऊन पोचला आहे. तीन वर्षांत येथे ५१ नवीन कंपन्यांनी असोसिएशनकडे नोंदणी केल्याचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

इनक्‍युबेशन स्पेस फुल
सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाने आयटी कंपन्यांसाठी या ठिकाणी इनक्‍युबेशन स्पेस उपलब्ध करून दिली आहे. आयटी कंपनीला कामकाज सुरू करण्यासाठी या ठिकाणी प्लग अँड प्लेची सुविधा दिली. वर्षभरापासून ही जागा फुल आहे. सध्या या ठिकाणी दहा कंपन्या कार्यरत आहेत. नव्या स्टार्टअप कंपन्यांचा विचार करून इनक्‍युबेशन स्पेसमध्ये वाढ करण्याबाबत सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाकडून विचार सुरू आहे.

प्राधान्य कशाला? 
आयटी कंपन्यांच्या भागात उत्तम शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. कंपन्यांना अवश्‍य असणारे कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध होते. आयटी पार्कमधील वातावरण गुंतवणुकीसाठी चांगले असल्यामुळे कंपन्या याला प्राधान्य देतात. बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या येथे कार्यरत असल्याने नव्याने येणाऱ्या कंपन्या याच ठिकाणी कार्यालय सुरू करत आहेत.

हिंजवडी परिसर आयटी कंपन्यांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे पुण्यात येणाऱ्या नव्या कंपन्या याच ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. प्रत्येक वर्षी नव्या कंपन्यांमध्ये होणारी वाढ चांगली आहे. आयटी उद्योगाच्या प्रगतीसाठी हे चांगले चित्र आहे. या भागातील वाहतूकव्यवस्था सुधारू लागली असून, मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक बळकट होणार असल्याने या भागात येणाऱ्या नव्या आयटी कंपन्यांचा भविष्यकाळ चांगला राहणार आहे.
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT