पुणे :विविध मागण्यांसाठी होमगार्ड रस्त्यावर उतरले आहे. पुण्याहून मुंबईच्या वर्षा बंगल्यावर पायी मोर्चा काढण्यात येणार असून राज्यातील शेकडो होमगार्ड पुण्यात जमले आहेत. पुणे ते मुंबई पायी मोर्चासाठी होमगार्ड आग्रही आहेत.
बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग काशिनाथ पुराने यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो होमगार्ड पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले असून आंदोलन करत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यलयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस भरतीतील 3 टक्के आरक्षणवरून 15 टक्के करण्याच्या मागणीसह होमगार्डला 365 दिवस काम मिळावे, त्याच बरोबर पोलिस प्रशासनाप्रमाणे विमा कवच देण्यात यावं, ''निष्काम सेवा'' हे ब्रीद वाक्य काढावं, आत्महत्या व अपघातात मयत झालेल्या होमगार्डना तत्काळ मदत जाहीर करावी अशा विविध मागण्या घेऊन होमगार्ड मुंबईच्या दिशेने निघाले होते.
पुणे पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवल असून हे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे सोबतच्या बैठकीनंतर मुंबईला जाण्यासाठी होमगार्ड आक्रमक झालेआहेत. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.