श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे राज्यातील विविध क्षेत्रांतील अग्रेसर असणाऱ्या ६३ संस्थांना ‘महाब्रॅंड’ पुरस्कार देऊन रविवारी येथील सभागृहात गौरविले. या वेळी उपस्थित मान्यवर. Sakal
पुणे

पुणे : उद्योजकांचे कौतुक

शून्यातून व्यवसायविश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा

चिकाटी, जिद्द, ग्राहकाभिमुख उत्पादनांसाठी सचोटीने कष्ट करून शून्यातून उद्योग, व्यवसायविश्व निर्माण करणारे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ’ने केला. कर्तृत्ववान उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच महाराष्ट्र देशात सदैव अग्रेसर राहावे, यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोलाचा कानमंत्र राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी दिला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्रातील ६३ ब्रँड्सचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुक्ष्म, लघु व मध्यम खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तर मनोहर जोशी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. यावेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते. यावेळी अवधूत गांधी यांनी स्वागतगीत गायले.

महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्षे झाले असताना, राज्याच्या प्रगतीला येथील उद्योग, व्यवसायांनी मोलाचा हातभार लावला आहे. देशात सक्षम व विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला घडविण्यासाठी अनेक ब्रँड्सचे मोलाचे योगदान आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात हिमतीने उद्योग उभारून, रोजगार देऊन स्वतःसह अनेकांच्या जीवनाचा उत्कर्ष केला, अशा ६३ ब्रँडचा भव्य कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रांचा राजकीय आणि सामाजिक सुधारणा, प्रशिक्षण हा मुख्य हेतू होता. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवीन माध्यमे आली, त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये बदल करावे लागले. पण हे बदल होत असताना ''सकाळ''ने मुळ ढाचा बदललेला नाही. ‘सकाळ’चे अनेक न्यास असून अनेक गोष्टी सातत्याने केल्या जातात. समाजाला बरोबर घेऊन समाजासाठी काम करणे, अशी ‘सकाळ’ची कायम भूमिका राहिली आहे. महिला, आरोग्य यांसह विविध सदरे ‘सकाळ’मध्ये सुरू आहेत. हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, शेकडो गावांना, संस्थांना मदत केली. पण हे कार्य करताना जात, धर्म, पक्ष यास स्थान दिले नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारावर ‘सकाळ’ने मदत केली. नागरिकांना गुंतवणूक, बचतीसाठी मार्गदर्शन करणारे ‘सकाळ मनी’ हे अर्थविषयक मासिक सुरू केले, त्याचा फायदा नागरिकांना होईल.’’

तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा

प्रतापराव पवार म्हणाले की, कोणताही व्यवसाय, उद्योग एका दिवसात घडत नाही. मी एक व्यावसायिक असल्याने मला याचे कौतुक आहे. तुमच्या व्यवसाय, उद्योगासाठी नवे संशोधन करा, भविष्यातील आव्हाने, तंत्रज्ञानात होणारे बदल याचा विचार करून हे बदल आत्मसात करा. व्यावसायिक म्हणून मला असे जाणवते की, अनेक उद्योग नामशेष होत आहेत. अशी आव्हाने लक्षात घेऊन उद्योजकांनी बदल करणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रात बदल होत असताना शिक्षण संस्थांनीही त्यांच्या शिक्षण पद्धतीत बदल करून उद्योगपूरक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजेत. उद्योगांच्या मागणीनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्सचे शिक्षण संस्थांमधून मिळाले तर विद्यार्थी घडतील.

दुसरी आवृत्ती येणार

प्रास्ताविकातून ब्रँड्स आॅफ महाराष्ट्रची भूमिका स्पष्ट करताना ‘सकाळ’चे संचालक-संपादक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने उद्योग, व्यापार या क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करावा, उद्योगाचा प्रवास मांडावा व भविष्याचा वेध घेणारी चर्चा करण्याची कल्पना मांडण्यात आली. देशाच्या उभारणीत उद्योजक, व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे. त्यात तुमच्या कहाण्या, यशोगाथा मांडल्या, त्यातून समाजावर उद्योगशीलतेचा संस्कार करण्याचा प्रयत्न करणे, नव्या लोकांना प्रेरणा देणे हा उद्देश या उपक्रमाचा आहे. त्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ब्रँड्स आॅफ महाराष्ट्राची दुसरी आवृत्ती येणार आहे. उद्योजकांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT