पुणे

बारामतीत हॉटेलला परवानगी न मिळाल्यास...

सकाळवृत्तसेवा

बारामती : गेल्या 73 दिवसांपासून ठप्प असलेल्या हॉटेल व लॉज व्यवसायाला बारामतीत घरघर लागली आहे. अजूनही या दोन गोष्टी सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली नसल्याने हॉटेल व लॉजमालक हवालदिल झाले आहेत. लवकर परवानगी मिळाली नाही तर अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

बारामतीत सर्वच व्यवहार सुरळीत सुरु झालेले असताना व सर्व नियम व अटींचे पालन करण्याची शाश्वती दिलेली असतानाही हॉटेल व लॉजचालकांनाच अजून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बारामती शहर व परिसरात 50 हॉटेल व ढाबे आहेत. चहाविक्रीचीही बारामतीत छोटी मोठी किमान 50 दुकाने आहेत. या दुकानात पाचशेहून अधिक तर हॉटेलमध्ये  2500 कर्मचारी आहेत. या सर्वांवरच सध्या बेकारीची कु-हाड कोसळली आहे. काही कर्मचारी काम सोडून गावाकडे निघून गेले आहेत, उर्वरित कर्मचारीही आता त्याच मानसिकतेत असल्याने हॉटेलचालकांपुढील आव्हान अजूनच वाढले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत साधारणपणे दररोज किमान तीन हजार लोक छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये नाश्ता, जेवण करण्यासाठी जातात. साधारण पाच हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत दररोज हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय होतो. याचा विचार करता गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत कोट्यवधींचे नुकसान त्यांनी सहन केलेले आहे. 

लॉजचालकांवरही संकट कायम

हॉटेलचालकांसोबतच बारामतीतील 25 लॉजचालकही अडचणीत आले आहेत. जवळपास पाचशेहून अधिक खोल्या रिकाम्या असल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळलेले आहे. परगावाहून बारामतीत येणा-यांची नाश्ता, जेवणासह निवासाचीही तर लग्न बस्त्यासाठी बारामतीत येणाऱ्या अनेक ग्राहकांचीही हॉटेल बंद असल्याने गैरसोय होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावरण्यासाठी लवकर परवानगी हवी

हॉटेल व लॉज व्यावसायिकांना कोरोनाच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी तातडीने व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय चालविले जातील, पण आणखी काही दिवस व्यवसाय बंद झाले तर अनेकांवर दिवाळखोर होण्याची वेळ येईल.

- शैलेश साळुंखे व प्रवीण आहुजा, बारामती हॉटेल असोसिएशन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT