house robbery continues in city valuables worth Rs 8 5 lakhs stolen in five incidents sakal
पुणे

Pune Crime News : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; पाच घरफोडीच्या घटनांमध्ये साडेआठ लाखांचा ऐवज चोरी

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी (ता. १२) एकाच दिवशी चोरट्यांनी कात्रज, धायरी, लष्कर, वडगाव शेरी परिसरात घरफोड्या करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.

तर गुरुवारी (ता. १४) लोहगाव परिसरात ओव्हाळ वस्तीमध्ये चोरट्यांनी घरातून भरदिवसा दीड लाखांची रोकड चोरून नेली.शहरातील कॅम्प परिसरात राजस्थान भवनजवळ दुकानातून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेली.

मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी भरत शंकर सुतार (वय ५३, रा. शिवनेरी नगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसरी घटना कात्रज परिसरात संतोषनगर येथील राजगड कॉलनी येथे घडली.

चोरट्यांनी भरदिवसा घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरी केली. याबाबत रमजानबी दाऊद शेख (वय ४५, रा. राजगड कॉलनी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धायरी येथील बेनकर वस्ती येथे मंगळवारी दुपारी चोरट्यांनी घरातून अडीच लाखांचा ऐवज चोरी केला. याबाबत ललित दत्तात्रेय सपकाळ (वय ३५, रा. समर्थ हाईट्स, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सपकाळ त्यांच्या आईला आनंदनगर येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड चोरून नेली.

चौथी घरफोडीची घटना वडगाव शेरी परिसरात मंगळवारी दुपारी घडली. चोरट्यांनी महादेवी शंकर राठोड (वय ३६) यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, लोहगाव भागात ओव्हाळ वस्तीमधील घरातून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड चोरी केली. याबाबत संतोष संभाजी कंद (वय ३७, कमलाई कॉम्प्लेक्स, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT