Housing Society 
पुणे

सोसायट्यांना आता ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची संधी

अनिल सावळे

पुणे - सहकार विभागातील कर्मचारी आपल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रत्यक्ष येऊन गृहनिर्माण सोसायटीचे नाव विचारतील. नोंदणी क्रमांक, किती युनिट आहेत, अध्यक्ष, सचिव यांचा मोबाईल क्रमांक, बिल्डरकडून कन्व्हेयन्स झाले की नाही, न झाल्यास त्याची कारणे असे प्रश्‍न विचारल्यास आश्‍चर्य वाटू देऊ नका. कारण आता सहकार विभागाकडून शहरात मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) विशेष अभियान सुरू केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 डीम्ड कन्व्हेयन्सची कार्यपद्धत 

  • जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडे नमुना क्रमांक सातमध्ये कागदपत्रांसह अर्ज करावा 
  • सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशिलासह सहजिल्हा निबंधक यांच्याकडून अधिकृत निर्णय करून घेणे 
  • आदेशानंतर दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे
  • नोंदणीकृत दस्तनुसार नगर भूमापन अधिकारी अथवा मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे अभिलेखात नाव नोंदणीसाठी अर्ज करणे 
  • संबंधित अधिकाऱ्याकडून प्रॉपर्टी कार्ड अथवा सातबारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून सोसायटीचे नाव नोंदविल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे  

  • सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे कागदपत्रे उपलब्ध असतील तरच त्यांनी मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी अर्ज सादर करावा. ऑफलाइन अर्जाची प्रत दोन हजार रुपये इतक्‍या रकमेच्या शुल्कासह जिल्हा उपनिबंधकांकडे आणि त्याचवेळी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी.
  • मानीव अभिहस्तांतराकरिता नमुना सातमधील अर्ज
  • सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र किंवा डीड ऑफ डिक्‍लरेशनची प्रत
  • वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभेतील ठरावाची प्रत
  • मिळकत पत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा, सदनिकाधारकांची यादी
  • सोसायटीने अभिहस्तांतरणासाठी बिल्डरला बजावलेली कायदेशीर नोटीस
  • बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र
  • भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे तसेच इमारतीबाबत सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार असल्याचे स्व-प्रमाणपत्र 
  • दोन हजार रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन फी
  • संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रतिज्ञापत्र 

ज्या बिल्डरनी स्वत: गृहनिर्माण सोसायटीचे अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स डीड) करून दिलेले नाही, त्या सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे. राज्य सरकारच्या सहकार विभागाने त्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानात गृहनिर्माण सोसायट्यांनी सहभागी व्हावे. 
- नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, पुणे

सहकार विभागाने हाती घेतलेल्या या मोहिमेस पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंट्‌सनी याचा लाभ घ्यावा. ही मोहीम १ ते १५ जानेवारी या कालावधीत मर्यादित न ठेवता महासंघाच्या वतीने वर्षभर वेबिनार, सभा, मेळाव्यांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. 
- सुहास पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ

अर्ज दाखल करण्यासाठी पत्ता  
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर
साखर संकुल इमारत, तळमजला, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर, पुणे- ४११००५
संकेतस्थळ : http://mahasahakar.maharashtra.gov.in

पुणे शहरातील सद्यःस्थिती  
गृहनिर्माण सोसायट्या - १८,३६५
प्राप्त अर्ज - २,५१०
डीम्ड कन्व्हेयन्स झालेल्या सोसायट्या - २,३४५
सुनावणी सुरू असलेले अर्ज - १६५

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT