hsc result  sakal
पुणे

HSC Result: भोर तालुक्यात बारावीचा निकाल ९४.४३%; ७ महाविद्यालयांत सर्वच विद्यार्थी पास

सकाळ वृत्तसेवा

Pune News: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा भोर तालुक्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. मागील वर्षी ९४.५५ टक्के निकाल लागला होता तर यावर्षी ९४.४३ टक्के लागला असला तरीही विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटली आहे. (maharashtra news)

गेल्या वर्षी बारावीला २ हजार १ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावर्षी १ हजार ९७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

तालुक्यातील ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज नसरापूर, जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर, अमृता विद्यालयम् नसरापूर, काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे, क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगाव आदींचा समावेश आहे.

याशिवाय व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालही १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय व्यवसायीक अभ्यासक्रम, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्यावसायीक अभ्यासक्रम, श्री शिवाजी सेकंडरी अॅड हायर सेकंडरी स्कूल, अनंतराव थोपटे महाविद्यालय, गर्ल्स ज्यु कॉलेज आदींचा समावेश आहे.

तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या १ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन श्रेणी मिळवली आहे. ५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्वाधिक १ हजार २७ विद्यार्थ्यांनी व्दीतीय श्रेणी मिळवली आहे.

तर १६२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मंगळवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला परंतु विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षीइतका उत्साह जाणवला नाही. विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्कंठाही पहावण्यास मिळाली नाही. शहरातील सायबर कॅफे आणि एमएससीआयटीच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रांवरही निकाल पहाण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम होती.

तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे - राजा रघुनाथराव विद्यालय व ज्यु कॉलेज भोर (९५.९७), छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज भोर (९१.४८), शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज नसरापूर (१००), अनंतराव थोपटे कनिष्ठ महाविद्याल भोर (८४.८७), गर्ल्स ज्यु कॉलेज भोर (८२.३५), महात्मा ज्योतीबा फुले प्रशाला व ज्यु कॉलेज शिंदेवाडी (८३.८७), न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज संगमनेर (७८.७८), माध्यमिक विद्यालय व ज्यु, कॉलेज खानापूर (८३.३३), दिनकरराव धाडवे पाटील ज्यु कॉलेज सारोळे (९८.३६),

जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर (१००), अमृता विद्यालयम् नसरापूर (१००), काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे(१००), क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव (१००), युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय (१००), राजगड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स (९८.६८), नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगाव (१००).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT