Online Class 
पुणे

अकरावीच्या ऑनलाइन वर्गातून एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला डावलले

सकाळवृत्तसेवा

पुणे - अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र हे वर्ग सुरू करताना केवळ पारंपरिक विद्याशाखांचा विचार करण्यात आला आहे. मात्र, व्यवसाय अभ्यासक्रमाचा (एचएसव्हीसी) कोणताही विचार अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करताना केला नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे 'एचएसव्हीसी'तून अकरावीला प्रवेश घेतलेल्या आणि घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दहावीचा निकाल लागल्यानंतर तीन महिने झाले, तरी अद्याप अकरावी प्रवेश न झाल्यामुळे   हजारो विद्यार्थी हताश झाले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु दहावीनंतर एचएसव्हीसीतून अकरावीला प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशात इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून अकरावीत प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. मात्र एचएसव्हीसीचे वर्ग सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकरावीच्या ऑनलाइन वर्गात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी मागील आठवड्यात सुरू झाली. त्यात विद्यार्थ्यांच्या माहितीचा अर्ज असून त्यात विद्यार्थ्यांना अकरावीसाठी निवडलेल्या शाखेचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र त्यात अकरावी ऑनलाईन वर्गासाठी चौथी शाखा असलेल्या एचएसव्हीसी या कौशल्य विकास विभाग अंतर्भूत करण्यात आला नसल्याने त्यातील विद्यार्थी हताश होत आहेत.

'आमच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा निवडलेल्या मुलांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. तसेच त्यांना यु-ट्यूबवर देखील अभ्यासाशी संबंधित व्हिडीओ पाहता येत आहेत. परंतु अजुन आमच्या अभ्यासासाठी अशाप्रकारचे कोणतेही वर्ग सुरू झालेली नाहीत. त्यामुळे अकरावीच्या अभ्यासक्रमात एचएसव्हीसी अभ्यासक्रम निवडलेले आम्ही विद्यार्थी मागे पडू की काय अशी भीती वाटत आहे."
- एक विद्यार्थी

'नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात रोजगाराभिमुख आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य  देण्यात आले आहे. त्यात राज्यात राबविण्यात येत असलेला एचएसव्हीसी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी बारावीनंतर लगेचच स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम असतात. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे देखील गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आता केवळ पारंपरिक विद्याशाखांचे अकरावीचे वर्ग ऑनलाइनद्वारे सुरू झाले आहेत. त्यामुळे एचएसव्हीसीच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे."
- प्रशांत आडमुठे, शिक्षक, के के घुले कनिष्ठ महाविद्यालय, मांजरी

येत्या आठवडयात 'एचएसव्हीसी'चे ऑनलाइन वर्ग सुरू होतील : दिनकर पाटील
'अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सुरवातीच्या टप्प्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. येत्या आठवडयात एचएसव्हीसी शाखेचे देखील ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. सध्या त्यासंदर्भात नियोजनाचे काम सुरू आहे."
- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT