Coronavirus File Photo
पुणे

पुण्यात वीकेंड लॉकडाउनचा जबरदस्त परिणाम, दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट

पुणे शहरात वीकेंड लॉकडाऊनचा जबरदस्त परिणाम दिसून आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे शहरात वीकेंड लॉकडाऊनचा जबरदस्त परिणाम दिसून आला असून बुधवारी दिवसभरात ४,२०६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपेक्षा आजच्या रुग्णसंख्येत बरीच घट झाली आहे. त्याचबरोबर ४,८९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४६ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहरात आज ४,२०६ नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ३,४४,०२९ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर दिवसभरात ४,८९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आजवर बाधित रुग्ण बरे झालेल्यांची संख्या २,८४,८०१ वर पोहोचली आहे. आज २१,३२५ जणांची कोरोना चाचणी झाली असून आजवर १७,८६,६७१ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. तसेच दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर शहरातील मृतांची संख्या ५,९०२ वर पोहोचली आहे. शहरात सध्या १,१५८ गंभीर रुग्ण असून ५३,३२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात दिवसभरात ७,८८८ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०,५७८ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ९४ रुग्णांचा मृत्यू झाला तर सध्या ९७,१९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात आजवर ६,७६,०१४ रुग्णांची नोंद झाली असून ५,६८,००२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आजवर १०,९८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १,५१७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३,३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या २२,४४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यांपैकी ६,१३६ जण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून १६,३०६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर दिवसभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात ९,७५३ जणांची कोरोना चाचणी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: एक्झिट पोलबाबत संजय राऊत खरंच बोलले, कारण..... शायना एनसी यांनी केला 'हा' दावा

IND vs AUS 1st Test: ...तर तुम्हाला तो ऑस्ट्रेलियात दिसेल! जसप्रीत बुमराहने दिले मोहम्मद शमीबाबत मोठे अपडेट्स

Udayanraje Bhosale : महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार...खासदार उदयनराजेंना विश्वास; शिवेंद्रसिंहराजेंच्या मताधिक्यात होणार वाढ

Adani Group Responds To Bribery Charges: अमेरिकेने केलेल्या आरोपांवर अदानी समुहाची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदन शेअर करत म्हणाले...

२३ चेंडूंत ९२ धावा! वीरूचा लेक आर्यवीर सेहवागची शतकी खेळी; संघाला मिळवून दिली आघाडी

SCROLL FOR NEXT