Baner Road 
पुणे

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यात दुपारनंतर तीन झालेल्या मुसळधार पावसानं पार दाणादाण उडाली आहे. बाणेर आणि शिवाजीनगर हे रस्ते गेल्या दोन ते तीन तासांपासून वाहतूक कोंडीमुळं जाम झाले आहेत. या भागातील ऑफिसेसमधून सुटलेले अनेक नागरिक दोन तासांपासून अडकून पडल्यानं अक्षरशः वैतागले आहेत.

नेमकं काय घडलंय?

पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपल्यानं अनेक मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. खडकी येथील रेंजहिल्स परिसरात रेल्वेपुलाखालील रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडाला असल्यानं इथून जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहनं वळून भोसले नगरमार्गे पुन्हा शिवाजीनगर रस्त्यावर येत असल्यानं शिवाजीनगरकडं जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोच्या पुलाचं काम सुरु आहे, त्यामुळं इथ आधीच वाहतूक वळण्यात आल्यानं ती संथगतीनं सुरु असते. त्यातच अजूनही पाऊस सुरुच असल्यानं दुचाकी आणि चारचाकी वाहनं चालवताना चालकांची दमछाक झाली. अडकलेल्या काही नागरिकांनी सांगितलं की ते गेल्या दोन तासापासून या बाणेर-शिवाजीनगर रोडवरील ट्राफिकमध्ये अडकून पडले आहेत. वाहनं पुढेच जात नसल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. बाणेर रोडवर आयसरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर शिवाजीनगर रोडवर शिमला ऑफिसपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे.

पोलिसांनी पुणे विद्यापीठ चौकात आणि त्याच्या आलिकडेच वाहनं थांबवून ठेवली आहेत. कारण रेंजहिल्स भागातून शिवाजीनगरच्या रस्त्यावर वाहनं परत येत असल्यानं वाहतूक पुढेच जात नाहीए. परंतू औंधकडे जाणारी वाहतूक विद्यापीठ चौकातून पोलीस सोडत आहेत. यामुळं सेनापती बापट रोडवरही नेहमीप्रमाणं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT