Humani Ali Department of Agriculture appeals to farmers neem bore acacia trees sakal
पुणे

प्रकाश सापळ्यांद्वारे हुमणी अळीचा प्रादूर्भाव रोखा - ज्ञानेश्वर बोटे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच होणारा हुमणी अळीचा शेतकऱ्यांनी वेळीच रोखावा. यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. हे प्रकाश सापळे कडूनिंब, बोर, बाभूळ या झाडांच्या शेजारी लावावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. जून महिन्यातील पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे हे जमिनीतून बाहेर पडत असतात. हे भुंगेरे जेव्हा जमिनीतून बाहेर पडतील, त्यावेळी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास, हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबविले पाहिजे, अशी अपेक्षा बोटे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस तर, रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिकांना हुमणी अळीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असतो. या अळीच्या उपद्रवामुळे पिकांचे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होत असते. शाश्वत पाणीपुरवठयाच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर, अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पिक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते.

वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनींब, बोर या झाडांवर गोळा होत असतात. आधी मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येत असतात. त्यानंतर . नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होऊन नंतर नर मादी वेगळे होत असतात. हे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरे नष्ट होतील, असे बोटे यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT