pimpri-m.jpg 
पुणे

Video : आणखी लॉकडाउनच्या भीतीने हिंजवडीत शेकडो मजूर रस्त्यावर

सकाळवृत्तसेवा

हिंजवडी : हिंजवडी आयटी परिसरात माणच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाचशेहून अधिक परप्रांतीय मजुरांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा घातला. आम्हाला आमच्या गावी जाऊद्या किंवा आम्हाला दर आठवड्याला खर्ची द्या अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी लाॅकडाऊनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. माण (ता. मुळशी) येथील शापुरजी पालमजीच्या नियोजित जॉयव्हीला बांधकाम प्रकल्पात काम करणारे हे मजूर होते.

हिंजवडी पोलिसांनी वेळेतच त्यांना रोखून पुन्हा प्रकल्पात नेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर ते शांत झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लोकडाऊन मुळे या बांधकाम साइटवर सुमारे एक हजारहून अधिक परप्रांतीय मजूर मागील एक महिन्यापासून अडकून पडले आहेत. प्रकल्प व्यवस्थापनाने त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली असली तरी ठेकेदाराकडून त्यांना वेळेत पगार व खर्ची मिळत नसल्याचा आरोप यावेळी मजुरांनी केला. 

मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेआकराच्या सुमारास हे सर्व मजूर प्रकल्पातील मजूर वसाहतीतून बाहेर पडले व घोषणाबाजी करत माण हिंजवडी मुख्य रस्त्याने हिंजवडीच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांनी अन्य बांधकाम साईटवरील मजुरांना देखील या मोर्चात सहभागी होण्यास गळ घातली, परंतु हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळेतच जमावाला शांत केले. 

हिंजवडीचे वरीष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, निरिक्षक अजय जोगदंड यांनी मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन जमावाला शांत केले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रकल्प व्यवस्थापकांना बोलावून घेतले व मजुरांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी माणचे सरपंच राजेंद्र भोसले, सुनील भरणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करत जमावावर नियंत्रण मिळवले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मजुरांना सबोधितांना पोलिस निरीक्षक गवारी म्हणाले, ''लाॅकडाऊन उठवणे किंवा रेल्वे चालू करणे आमच्या हातात नाही परंतु शासन लवकरच याबाबत काहीतरी निर्णय घेईल. तोपर्यंत तुम्ही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, मात्र नियम मोडून रस्त्यावर जमाव केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.'' याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाने प्रतिक्रिया देण्याचे टाळले.  

मजूरांच्या प्रमुख मागण्या - 
-आम्हाला आमच्या मूळगावी कुटूंबाकडे जाउद्यात.
-ठेकेदाराने खर्ची दिली तरी पगारातून कट करणार असल्याची भीती
-उधार घेतलेल्या किराणा मालाची रक्कम प्रकल्प व्यस्थापनाने भरावी.
-काम नसले तरी आमचा पूर्ण पगार आमच्या हातात द्यावा तो ठेकेदाराकड देऊ नये. 
-लाॅकडाऊन उठण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे सरकारने मजुरांसाठी रेल्वे सुरू कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT