अटक sakal
पुणे

Crime News : पत्नीचा खून करून गळफास घेतल्याचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक

या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पत्नीचा खून करून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

अंजना ऊर्फ अंजली बापू खंडाळे ऊर्फ अंजली स्वप्नील मोरे (वय २९, रा. तीन हत्ती चौक, धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पती स्वप्नील शिवराम मोरे (वय ३०, रा. घोरपडी पेठ) या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला गुरुवारी (ता. १२) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली मोरे शनिवारी (ता. ६) घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. नातेवाइकांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेस मृत घोषित केले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. महिलेच्या मृत्यूबाबत पोलिसांना संशय आल्याने चौकशी सुरु केली. त्यात महिलेच्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिला फासावर लटकवून निघून गेल्याची माहिती तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली.

पोलिसांनी पती स्वप्नील शिवराम मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु आरोपी पती आपण काहीच केले नसल्याच्या आविर्भावात वावरत होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पतीने अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेत नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिला नायलॉन दोरीने छताला लटकवून गळफास घेतल्याचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदिनी वग्यानी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, रेश्मा साळुंखे, सहाय्यक उपनिरीक्षक सोपान नावडकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT