Ambegaon: खडकवाडी ता. आंबेगाव येथील वडदरावस्ती येथे संतोष रामदास पडवळ व बबुशा वामन पडवळ या आदिवासी ठाकर समाजातील या दोन शेतमजुरांच्या शेताच्या कडेला असलेल्या झोपड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दोन्ही झोपड्यातील १० पोती धान्य, कपडे, दोन भुईमुगाच्या शेंगाची पोती , टीव्ही तसेच संसारपयोगी सर्व साहित्य, लहान मुलीचे कानातील सोन्याचे दागिने व पायातील चांदीचे पैंजण व रोख सुमारे ९० हजार रुपये जळुन खाक झाले. दोन्ही शेतमजुरांचे एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने १० वर्षाच्या मुलीला आग लागल्याचे समजल्याने झोपडीत झोपलेल्या तिच्या आईला उठवल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत सर्वच जळुन खाक झाल्याने दोन्ही कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे.
मुळचे पहाडदरा (ठाकरवाडी) येथील संतोष पडवळ व बबुशा पडवळ हे दोघेहि खडकवाडी येथे शेती अर्धलीने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात दोघांचीही कुटुंबे शेताच्या कडेला झोपडी करून राहतात. दोन्ही कुटुंबे मिळून एकूण नऊ व्यक्ती आहेत आज बुधवारी सर्वजण शेतात गेले होते तर बबुशा पडवळ यांच्या पत्नी पूनम या आजारी असल्याने झोपडीमध्ये झोपल्या होत्या त्यांच्या बरोबर त्यांची १० वर्षाची मुलगी भारती होती.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारती झोपडीच्या बाहेर आली असता तिला झोपडीला आग लागल्याचे दिसले तिने तिच्या आईला उठवून बाहेर आणले त्यांनी आरडा ओरडा केल्याने शेतात काम करणारे संतोष पडवळ व बबुशा पडवळ धावत आले झोपडीत दोन गॅस सिलेंडर च्या टाक्या असल्याने जवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते जवळच राहणारे ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव पोखरकर हेही घटना स्थळी आले त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांना मोबाईल वरून माहिती दिल्यावर त्यांनी भीमाशंकर साखर कारखान्याचा पाण्याचा टॅंकर घटनास्थळी पाठवला टॅंकर साह्याने आग पूर्णता विझवता आली.
संतोष कुरकुटे, पहाडदऱ्याचे पोलीस पाटील निलेश भालेराव, गुरुदेव पोखरकर, अनिल सुक्रे, सुर्यकांत देशमुख, ज्ञानेश्वर डोके, सुरेश सुक्रे, दत्तात्रय भागवत, बाबाजी डोके आदींनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यत दोन्ही झोपड्यातील १० पोती धान्य, कपडे, दोन भुईमुगाच्या शेंगाची पोती , टीव्ही तसेच संसारपयोगी सर्व साहित्य, लहान मुलीचे कानातील सोन्याचे दागिने व पायातील चांदीचे पैंजण व संतोष पडवळ व बबुशा पडवळ या दोघांनीही शेतातील गवार व फ्लावर विक्रीतून आलेले प्रत्येकी दोघांचे ४५ ते ५० हजार रुपये असे दोघांचे मिळून रोख सुमारे ९० हजार रुपये जळुन खाक झाले अशा प्रकारे दोन्ही शेतमजुरांचे एकूण सुमारे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे. पारगाव कारखाना पोलीस तसेच तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.
दोन्ही झोपड्यांमध्ये गॅस सिलेंडर च्या टाक्या होत्या सुदैवाने त्याचे स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आगीत झोपडीतील सर्व साहित्य अगदी मुलांचे शाळेतीतील दप्तर सुद्धा जळुन खाक झाल्याने दोन्ही कुटुंबातील सर्वांचे फक्त अंगावरील कपडे राहिले आहे.
तीन दिवसापूर्वी झोपडीमध्ये कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने झोपडीतील कपडे फाडून निघून गेली होती तर दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्ती झोपडीजवळ संशयास्पद हालचाल करताना दिसल्याने शेतातून पडवळ यांनी आवाज दिल्याने ती व्यक्ती पळून गेली होती त्यामुळे कोणीतरी जाणूनबुजून आग लावली असल्याचा अंदाज दोन्ही पडवळ कुटुंबाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.