I am satisfied with selection of Supriya Sale Praful Patel Ajit Pawar ncp politics pune esakal
पुणे

Pune : सुप्रिया सळे, प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीवर मी समाधानी - अजित पवार

मला वाईट वाटण्यासारखे काही नाही. मी समाधानी आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय एकमताने घेतलेला आहे. त्यात मला वाईट वाटण्यासारखे काही नाही. मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी दिली.

दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार हे सायंकाळी पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ‘‘मी पक्षात नाराज आहे म्हणून चर्चा झाली, पण असल्या बातम्या देत जाऊ नका. माझे विमान असल्यामुळे दिल्लीमध्ये मला बोलता आले नाही.

पक्षाने एक समिती होती, त्यामध्ये पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा व कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना करा असे मी सांगितले होते. पण बाकीच्यांनी आत्ता केवळ राजीनामा मागे घेण्याबाबतच निर्णय घ्यावा बाकीचे निर्णय नको असे सांगितले होते. त्यामुळे पक्षात लोकशाही असल्याने बहुसंख्यांच्या मताचा आदर करावा लागतो.

मी आणि प्रफुल्ल पटेल एकाच वेळी खासदार झालो, पण मी परत आलो. सुप्रिया सुळे या अधिक काळ दिल्लीत असतात. मी व सुप्रिया सुळे अशी दोन शक्तीस्थळे नाहीत. सुप्रिया सुळे या दिल्लीत आहे. मी राज्यात आहे, विरोधी पक्षनेताची जबाबदारी पार पाडत आहे.

विनाकारण माध्यमांमध्ये गॉसिप केले जाते. मला महाराष्ट्रातील राजकारणातच इंटरेस्ट आहे हे मी अनेक वेळा सांगितले आहे. या नव्या जबाबदाऱ्या देणे हा आमच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, इतरांनी यात लक्ष घालायचे काही कारण नाही. आम्ही उत्तम टीम वर्क करून चांगले यश मिळवून देऊ.

बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर आहे. महिलांची क्रूरपणे हत्या केली जात आहे, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायम आहेत. महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल देऊन इतर चर्चा घडत आहे, अशी टीका ही अजित पवार यांनी केली.

दादांचा चकवा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयामध्ये स्नेहमेळावा आयोजित केला होता. अजित पवार हे दिल्लीवरून पुण्यात आले की थेट शहर कार्यालयात सहा वाजता येणार असल्याचा निरोप पक्षातर्फे देण्यात आला.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सर्वजणच वाट पाहात असताना रात्री आठच्या सुमारास अजित पवार येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहर कार्यालयातील गर्दी पांगली. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे यांच्यासह इतर पदाधिकारी एकाच वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT