IAS Pooja Khedkar sakal
पुणे

Pooja Khedkar : पूजा खेडकर अद्याप ‘नॉट रिचेबल’

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावूनही त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावूनही त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत. पोलिसांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्या ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले आहे.

पूजा खेडकर २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मसुरी येथे प्रशिक्षणानंतर त्यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त केले होते. आलिशान खासगी मोटारीवर लाल दिवा लावणे, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि स्वतंत्र कक्षाच्या मागणीमुळे चर्चेत आल्या होत्या.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. त्यानंतर त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर खेडकर यांनी जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरुध्द छळवणूक केल्याची तक्रार वाशीम पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते.

त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे संपर्क होत नव्हता. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना तिसऱ्यांदा इ-मेलद्वारे समन्स बजावले. परंतु त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तक्रारदार पूजा खेडकर यांचा मोबाईल बंद आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांना नुकतेच इ-मेलद्वारे तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. परंतु त्या अद्याप हजर झालेल्या नाहीत.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT