IAS Puja Khedkar Case And Dilip Khedkar Esakal
पुणे

Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना लाचखोरीमुळे सक्तीची निवृत्ती? ठाकरे सरकारच्या काळात झालं होतं निलंबन

IAS Pooja Khedkar Case: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत असताना खेडकर यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली होती.

आशुतोष मसगौंडे

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाशी संबंधित पूजा खेडकरच्या वडिलांचे निलंबन आणि लोचखोरीची प्रकरणे समोर आली आहेत.

दरम्यान पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकर महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते. या कालावधीत त्यांचे दोन वेळा निलंबन झाले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत असताना खेडकर यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली होती. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिले आहे.

कोल्हापूरातील कारनामा

पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकर राज्य सरकारच्या सेवेत असताना 2007 पासून तीन वर्षे कोल्हापूरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विभागीय अधिकारी होते. खेडकर यांनी या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप करणार पोस्ट एका युजरने एक्सवर लिहिली आहे.

या पोस्टमध्ये युजरने असा आरोप केला आहे की,"कोल्हापूरमध्ये खेडकर प्रदूषण मंडळात विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना छोट्या-मोठ्या कारखान्यांना भेट देत कोणाला चिमणी लहान आहे, मोठी कर, कोणाला स्करबर वेगळा लाव असे सांगत. पुढे ते स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत आठ दिवसात पर्चस ऑर्डर काढून आगाऊ रक्कम पाठवा अन्यथा क्लोजरची कारवाई करू. याच कंपनीत खेडकरची पत्नी, मेहुणा व पूजा संचालक आहेत."

ठाकरे सरकारच्या काळात निलंबन

दिलीप खेडकरांवर असलेल्या आरोपांमध्ये पुणे आणि साताऱ्यातील उद्योजकांना त्यांनी त्रास दिल्याचेही आरोप आहेत. 2019 मध्ये, साताऱ्यातील सोना अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने, 50,000 रुपयांची जास्तीची लाच देण्यास नकार दिल्याबद्दल खेडकर यांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप केला होता.

दुसरीकडे पुण्यातील सुप्रभा पॉलिमर अँड पॅकेजिंग या फर्मने तक्रारीत खेडकर यांच्यावर २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात 2020 मध्ये दिलीप खेडकर यांचे निलंबन करण्यात आले होते.

सक्तीची निवृती

दिलीप खेडकर यांच्या कार्यकाळात त्यांंच्याविरोधात अनेक तक्रारी येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना 2023 मध्ये सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती.

दरम्यान नोकरीतून सक्तीची निवृत्ती घेतल्यानंतर खेडकर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे युनिटला दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये निवृत्त सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध कथित बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची खुली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर यांची एसीबीच्या नाशिक विभागाकडून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या तक्रारीत नवीन तक्रारीचा समावेश करावा किंवा स्वतंत्र खुला तपास करावा, अशा सूचना पुणे विभागाने एसीबी मुख्यालयाकडून मागितल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT