Ice Qube esakal
पुणे

Junnar News : आकाशातून शेतात पडला तब्बल 30 ते 40 किलोचा मोठा बर्फाचा गोळा; पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

पराग जगताप

परिसरातील काही शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तो पाहिला, तसेच काही मुलांनी तेथील बर्फ खेळण्यासाठी नेला. त्यानंतर येथे बघ्यांची गर्दी जमली.

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथून जवळच असलेल्या डोमेवाडीत सोमवारी दुपारी आकाशातून (Sky) वेगाने बर्फाचा मोठा गोळा खाली जमिनीवर पडला. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, हा बर्फाचा गोळा अंदाजे ३० ते ४० किलोचा असावा.

ओतूर येथील डोमेवाडीत बाबाजी वाजगे यांच्या सोयाबीनच्या शेतात दुपारी साडेबारा वाजेदरम्यान बर्फाचा मोठा गोळा पडला. याच परिसरातील काही शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तो पाहिला, तसेच काही मुलांनी तेथील बर्फ खेळण्यासाठी नेला. त्यानंतर येथे बघ्यांची गर्दी जमली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके, तलाठी अतुल विभूते, कर्मचारी संदीप राऊत यांनी सदर ठिकाणी दुपारी अडीच वाजेदरम्यान जाऊन पाहणी केली. यावेळी तो बर्फाचा गोळा वितळला होता. मात्र, त्याठिकाणी पाणी व छोटा खड्डा पडलेला दिसून आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Assembly Elections: विधासभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

SCROLL FOR NEXT