Illegal Hoarding sakal
पुणे

Illegal Hoarding : पीएमआरडीए अजूनही अनाधिकृत होर्डिंग्जवर मेहेरबान; दहा महिने होऊनही कारवाई नाही

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत मोठ्या प्रमाणात होर्डिंग्जचा धोका वाढला आहे. प्रशासनाने सूचना देऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, एकाही होर्डिंग्ज मालकाने अद्याप परवानगी घेतली नसून प्रशासनाने या कारवाईबाबत कानाडोळा केलेला दिसत आहे. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासन या अनाधिकृत होर्डिंग्जधारकावर मेहेरबान आहे काय, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

सहा वर्षांपूर्वी पुणे शहरात होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती नुकतीच मुंबईतील घाटकोपर येथे झाली आहे. होर्डिंजमुळे होणाऱ्या दुर्घटनेचा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमा ओलांडून होर्डिंग्ज व्यवसाय जिल्ह्यातही पसरला आहे. पीएमआरडीए हद्दीअंतर्गत विविध रस्ते, इमारती व चौकात असे दीड हजारांवर अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत.

पुणे - सोलापूर, बंगळूर, अहमदनगर, सासवड, नाशिक, मुंबई आदी महामार्गावर हे प्रमाण मोठे आहे. यातील अनेक होर्डिंग्ज धोकादायक आहेत. कमकुवत व अशास्त्रीय पद्धतीने उभारलेले अनेक होर्डिंग्ज वादळ वाऱ्यात कोसळण्याच्या घटना दरवर्षी पाहायला मिळतात. याही वर्षी अशा घटना घडत आहेत.

अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज बाबत पीएमआरडीएने गांभीर्याने घेऊन दहा महिन्यांपूर्वी आकाशचिन्ह धोरण राबविले. आकाश चिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक आदींसाठी विकास परवानगी बंधनकारक केली आहे. मात्र, आजपर्यंत पीएमआरडीएकडे त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. याउलट प्रशासनाने इतक्या महिन्यात त्या विरोधात एकही कारवाई केलेली दिसत नाही.

त्यामुळे सध्या अनाधिकृत होर्डिंगच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून त्यापासून होणारा धोकाही वाढला आहे. पीएमआरडीएने हद्दीतील अशा अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, अद्याप एकाही होर्डिंग्जवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

'पीएमआरडीए हद्दीत विशेषतः शहरालगतच्या गावांमध्ये सर्व मार्गांवर अनाधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्सचे जाळे पसरले आहे. पीएमआरडीए सोडाच, त्यांच्याकडून ग्रामपंचायतसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचीही परवानगी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे नको त्या ठिकाणी व अशास्त्रीय पद्धतीने होर्डिंग्ज उभारले गेले आहेत. मांजरी खुर्द - कोलवडी रस्त्यावर गेल्या महिन्यात असेच होर्डिंग कोसळले होते. पावसामुळे रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. पीएमआरडीए व ग्रामपंचायत प्रशासनाने अशा अनाधिकृत होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करून ती काढून टाकावीत.'

- अशोक आव्हाळे, मांजरी खुर्द

'आम्ही सर्व्हे करून हद्दीतील अनाधिकृत होर्डिंग्ज मालकांना नोटीस दिलेल्या आहेत. मात्र, कोणीही नूतनीकरण अथवा नव्याने परवानगीसाठी आलेले नाही. सर्व्हेमध्ये सुमारे दीड हजार होर्डिंग आहेत. कारवाईसाठी मागवलेल्या निविदा आलेल्या असून लवकरच अनधिकृत होर्डिंग भुईसपाट केली जातील.'

- सुनील मरळे, सहसंचालक, नगररचना तथा महानगर नियोजनकार, पीएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT