Illegal moneylenders in pune Lenders beat borrowers threaten to kill crime pune police sakal
पुणे

Pune News : शहरात बेकायदा सावकारी फोफावली

सावकारांकडून कर्जदारांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी... मुद्दल, व्याज आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची...त्यानंतर पुन्हा जादा पैशांची मागणी...पैसे न दिल्यास मारहाण, अपहरण...जीवे मारण्याची धमकी असा बेकायदा सावकारीचा आणि खंडणीचा धंदा शहरात जोरात फोफावला आहे.

एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते. परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी, यासह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पतसंस्थेकडे जाते. परंतु पत नसल्यामुळे तेथेही कर्ज मिळत नाही. काही पतसंस्था कर्जदारांकडून सह्या केलेले कोरे धनादेश घेतात. त्यावर तारीख, रक्कम याचा उल्लेख नसतो.

पतसंस्थेतही निभाव न लागल्यास व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. त्यात पुन्हा बेकायदा सावकारी. हे सावकार कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, दंडव्याज आकारतात. बऱ्याचदा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असते.

मुद्दल परत करूनही जादा पैशांसाठी बेकायदा सावकारांकडून कर्जदारांना घरी जाऊन शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. जामीनदारांनाही मानसिक त्रास दिला जात आहे. परंतु अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांविरुध्द पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बेकायदा सावकाराकडून अपहरण

दांगट पाटीलनगर, शिवणे येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने बेकायदेशीर सावकाराकडून कर्ज घेतले. या कर्जदाराने मुद्दल, व्याज आणि दंड व्याजाची रक्कम परत केली. तरीही सावकाराने जादा पैशांची मागणी करून फिर्यादीचे अपहरण केले. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळले. तसेच, फिर्यादीच्या भागीदाराची मोटारही जबरदस्तीने घेऊन गेले. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुरुवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सात लाखांपोटी दिले १३ लाख ८१ हजार रुपये

कोथरूडमधील एका व्यक्तीने बेकायदा सावकाराकडून सात लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले. या रकमेपोटी त्यांनी मुद्दल, व्याज आणि दंडव्याज मिळून १३ लाख ८१ हजार रुपये सावकाराला परत केले. तरीही कर्जदाराकडे त्याच्या तीन खोल्यांचा ताबा आणि आणखी दोन लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांनी बेकायदा सावकारांविरुध्द निर्भिडपणे पोलिसांकडे फिर्याद द्यावी. परंतु काहीजण भीतीपोटी तक्रार देत नाहीत. अशा वेळी कर्जदाराने निनावी अर्ज दिला तरी पोलिस त्या सावकाराची चौकशी करतील. त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर करून शहरातील बेकायदा सावकारीचे समूळ उच्चाटन केले जाईल.

- सुनील पवार, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT