पुणे : अवैध ताडी विक्रीप्रकरणी एका गुन्हेगाराला ‘MPDA’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी औरंगाबादच्या कारागृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यात अवैध ताडी विक्रीच्या गुन्ह्यातील ही पहिलीच ‘एमपीडीए’ कारवाई असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. (Illegal Working Police Action)
अनिल व्यंकटेश भंडारी (वय २५, रा. गिरिराज चौक, पाषाण) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अवैध ताडी विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पोलिस आयुक्तालयाकडे ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईचे आदेश जारी केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डी’ विभागाचे निरीक्षक संजय डेरे, दुय्यम निरीक्षक गणेश केंद्रे, जवान सागर ध्रुवे आदींनी ही कारवाई केली.
अवैध ताडी आणि दारू विक्रीप्रकरणी ‘एमपीडीए’ कारवाईबाबत पुणे पोलिस आयुक्तालयाकडे चार प्रस्ताव, पिंपरी पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयास प्रत्येकी एक असे एकूण सहा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असे अधीक्षक झगडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.