bappa.jpg 
पुणे

Ananat chaturdashi 2020 : बाप्पा चालले आपल्या गावाला...; पुण्यात भावपूर्ण वातारणात गणरायाला निरोप

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या..... गणपती चालले गावाला.... चैन पडेना आम्हाला..... या गजरात बाणेर बालेवाडी परिसरातील बहुसंख्य गणपती मंडळांनी आणि घरातून बाप्पाला आज निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील गणेश मंडळानी मंडपातच गणपतीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले, तर दहा दिवसांचे घरगुती गणपतींचे नागरिकांनी घरातच बादलीमध्ये विसर्जन केले, तर काहींनी मात्र महापालिकेच्या विसर्जन हौदाला प्राधान्य देत बाप्पाचे विसर्जन केले.

यावर्षी आम्ही गणपती विसर्जनासाठी घाटावर न जाता, फिरत्या हौदात गणपती विसर्जन करण्याचा पर्याय निवडला. मूर्तीदान हा पर्याय ही आम्हाला देण्यात आला होता पण पारंपारिक रित्या गणपतींचे विसर्जन करण्या साठी आम्ही या हौदात  गणपतीचे विसर्जन केले.

-अनिकेत मुरकुटे, बाणेर

खराडी,  चंदननगर परिसरात बाप्पाला साध्या पद्धतीनं निरोप...

रामवाडी : खराडी,  चंदननगर,  वडगावशेरी,  भागात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील नागरिकांनी कृत्रिम तसेच पालिकेच्या फिरत्या हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास प्रथम प्राधान्य दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारे 138 गणेश मंडळे आहेत त्या पैकी या वर्षी  121 मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला तर 17 गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. काही मंडळानी गणेश मूर्तीचे विसर्जन हे जाग्यावर तयार केलेल्या हौदात केले. तर काही ठिकाणी नागरिकांनी तसेच मंडळानी फिरत्या हौदात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. गणेश मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केली त्या ठिकाणी नागरिक जाऊन मूर्ती तसेच निर्माल्य देत होते.

पालिकेच्या फिरत्या हौदमध्ये ज्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्या मूर्त्या बंदिस्त वाहनांतून लोणीकंद येथे नेऊन पुन्हा विधीपूर्वक विसर्जन करण्यात येणार आहे.

-शंकर जगताप, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, नगररोड क्षेत्रीय कार्यालय

विश्रांतवाडी परिसरात शांततेत गणपती विसर्जन...
विश्रांतवाडी : विश्रांतवाडी परिसरामध्ये मिरवणूक व डीजेच्या तालावर नाचण्याला फाटा देऊन या वर्षी गणपती विसर्जन साध्या पद्धतीने व मिरवणुकीविना शांततेत करण्यात आले. घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी विश्रांतवाडी, कळस, धानोरी परिसरात मनसे तर्फे अमोनिआ पावडर घरोघरी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी घरीच गणेशविसर्जन केले. तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रभाग क्र. 1 साठी विश्रांतवाडी येथील विठ्ठलराव गाडगीळ शाळा, प्रभाग क्र. 2 मध्ये मेंटल कॉर्नर येथील कै. नानासाहेब परुळेकर शाळा व प्रभाग क्र. 6 मध्ये येरवड्यातील अनुसया सावंत शाळा येथे विसर्जन हौद, निर्माल्यसंकलन व मूर्तीदान सेवा ठेवली आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्य अधिकारी संजय घावटे यांनी सांगितले. तसेच महापालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या फिरते विसर्जन हौद रथालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुंढवा-केशवनगरमध्ये सामाजिक अंतर पाळत बाप्पाला निरोप

मुंढवा : केशवनगर -मुंढवा -कोरेगाव पार्क- ताडीवाला रोड परिसरात यंदा ढोल-ताशांच्या दणदणाटापासून मुक्त, गर्दी न करता, मुखपट्टी व सामाजिक अंतर पाळत साध्या पद्धतीने पालिकेने बनवलेल्या फिरत्या हौदात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंढवा येथील सूर्यमुखी गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुखदेव गायकवाड व हिंदू तरुण मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या वतीने गणपती विसर्जन हौद तयार करण्यात आला होता. त्यात गावातील नागरिकांनी पारंपारिक वाद्य, ढोल ताशा, बँड पथक, टाळ-मृदंगाचा गजर, गुलालाची उधळण याला फाटा देत साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. पालिकेकडून राजर्षी शाहू महाराज शाळेत निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. कुणी नदीकिनारी गणपती विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी जाऊ नये, कोणी मिरवणूक काढून, गर्दी करू नये. रस्त्यावर येऊ नये अशा सूचना आधीच मंडळे व नागरिकांना देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित रेजितवूड यांनी दिली.

औंधमध्ये फिरत्या हौदामध्ये गणेश विसर्जनास पसंती

औंध : दरवर्षी मोठ्या जल्लोषात व गर्दीत साजरा होणारा गणपती मुर्तींचा विसर्जन सोहळा यावर्षी औंध व परिसरात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंडळांच्या व घरगुती मुर्तींचे विसर्जन हे नदी पात्रात न करता पालिकेने व काही संघटनांकडून उपलब्ध करुन दिलेल्या फिरत्या हौदात, संकलन केंद्रावर व काहींनी घरीच बादलीत विसर्जन केले. तर काही जणांनी मुर्तींचे दान करत प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेला सहकार्य केले. औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम मंडळाने यंदा साध्या पद्धतीने हौदात मुर्तीचे विसर्जन केले.
मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गायकवाड रोहित शिंदे अमोल खताळ रोहन शिंदे सुधीर ठावरे, समीर खताळ, गणेश ढवळे ऋषभ खताळ विशाल शिंदे यांनी विसर्जनात सहभाग घेतला. तर बोपोडी येथे नगरसेवक प्रकाश ढोरे  यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करुन दिलेल्या विसर्जन हौदात गणेश भक्तांनी विसर्जन केले. गणेश भक्तांनी मूर्तींचे विसर्जन हौदात करावे यासाठी अविराज हुगे,सचिन अनकेल्लू, अंकल रावत, गणेश बायळे, प्रदीप पडगलमल, सचिन घोरपडे यांनी प्रयत्न केले. गणेश मुर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्या मुर्तींचा पुनर्वापर करण्याचे कार्य श्री फाऊंडेशनकडून दरवर्षी केले जाते. यावर्षीही महाळुंगे (पाडाळे ) येथे फाऊंडेशनकडून  गणेश भक्तांचे प्रबोधन करण्यात आले व मुर्तींचे विसर्जन नदीत करण्याऐवजी त्यांचे संकलन केले. यासाठी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर पाडाळे व सहका-यांनी पुढाकार घेतला. तर महाळुंगे ग्रामपंचायतीकडूनही या उपक्रमास प्रतिसाद मिळाला. सरपंच मयूर भांडे यांनीही फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाडाळे यांच्याकडे मुर्ती दान देऊन उपक्रमास सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT