पुणे

राजेगाव परिसरात उष्णतेमुळे शेतीच्या कामांवर परिणाम

CD

राजेगाव, ता. १ ः ढगाळ वातावरण संपल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. याचा परिणाम शेतीकामांवर होत असून पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे बळिराजा चिंताग्रस्त झाला आहे.

हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत चांगलीच थंडी राहिली. मात्र, मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. दरवर्षी होळी-पुनवेनंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो. यंदा मात्र, होळीच्या अगोदर उन्हाचा कडाका सुरू झाला. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून प्रखर उन्हाला सुरुवात होते. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

सकाळी ११ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत शेतात, रस्त्यावर निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कडक उन्हाळ्यापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी थंडपेयाचा आसरा घेतला आहे. तीव्र उष्णतेमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला असून घरात थांबणे देखील मुश्कील झाले आहे. एकीकडे नागरिकांची अशी स्थिती असताना दुसरीकडे मागील पंधरा दिवसांपासून विजेच्या लपंडाव सुरू असल्याने पिकांना पाणी देताना शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. रात्रभर पाणी भरण्यामुळे झोप मिळत नाही, तर दिवसा प्रचंड उकाड्यामुळे झोप होत नाही. याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठवड्यात भीमा नदीपात्रात पाणी आल्यामुळे काही अंशी पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे विजेचा प्रश्न सतावणारच आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चारापिके करपू लागली आहेत.


शेतीच्या कामांवर तीव्र उष्णतेचा विपरीत परिणाम झाला आहे. सध्या शेतात खरीपपूर्व हंगामातील मशागतीची लगबग सुरू आहे. परंतु, प्रचंड उष्णतेचा त्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करण्यास मजूर धजावत नसल्याने नाइलाजाने पहाटे लवकर शेतीची कामे करावी लागत आहेत.

-लालासाहेब नेपते, शेतकरी, राजेगाव (ता. दौंड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT