पुणे : जागतिक महामारी कोरोना व्हायरसने जगभरातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांबरोबरच मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
गाव ते विकसित शहरे आणि तालुक्यापासून ते देश-विदेशात कोरोनासंबंधी आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींवर एक नजर टाकूयात.
1. शुक्रवारी कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 6,088 नव्या रुग्णांची भर पडली असून बाधितांचा आकडा 1.18 लाखापर्यंत पोहोचला आहे. कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 3,583 झाली असून गेल्या 24 तासात 148 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 48,534 कोरोना बाधित पूर्णपणे बरे झाले असून रिकव्हरी रेट 40.97 पर्यंत वाढला आहे.
2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईंटची कपात करुन 4.4 करण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट देखील 40 बेसिक पॉईंटनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे रिव्हर्स रेपो रेट आता 3.35 असणार आहे. याबरोबरच कर्जाचा हप्ता तीन महिन्यांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, 2020-21 या आर्थिक वर्षात जीडीपी शून्यापर्यंत जाण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली आहे.
3. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 600 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील कोनोना बाधितांची संख्या 12,319 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत बाधितांचा आकडा वाढत असून शुक्रवारी सर्वाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच आत्तापर्यंत 208 कोरोना ग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
4. खासगी हॉस्पिटल आणि नर्सिंग होममधील 80 टक्के बेड कोरोना ग्रस्तांवरील उपचारासाठी ताब्यात घेणार असल्याचे महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
5. 31 मेपर्यंत विमान सेवा सुरु न करण्याची विनंती तामीळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. मात्र, सरकारने राज्यात ऑटोरिक्षा आणि साईकल रिक्षा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ही सेवा केवळ सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत असणार आहे. शिवाय रिक्षामध्ये केवळ एक प्रवासी असणे बंधनकारक आहे.
6. राष्ट्रीय वाहक एअर इंडियाने आज (शुक्रवार)पासून डोमेस्टिक वाहतुकीसाठी ऑनलाईन बुकींग सेवा सुरु केली आहे. मात्र, इतर खासगी कंपन्या इंडिगो आणि गोएअर यांनी अजून बुकींग सेवा सुरु केली नाही.
7. कॅब वाहतूक सेवा देणाऱ्या उबरने कर्नाटकातील आपली सेवा देणे पुन्हा सुरु केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत उबरला आपली सेवा देता येणार आहे.
8. इंडियन इन्सट्युट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथे बांधकाम स्थळावर काम करणाऱ्या स्थलांतरित मजूरांनी लॉकडाऊनच्या दोन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याचा आरोप केला आहे. मजुरांनी यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दरम्यान, इन्सट्युटने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
9. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला सर्व पातळ्यांवर काम करावं लागेल, असं ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
10. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार गेला आहे. तसेच कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,32,900 झाली आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.