पारगाव : आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील लोणी धामणी परिसरावर असलेली दुष्काळाची छाया कायम स्वरूपी हटवून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने या परिसरातील आठ गावांचे सर्वेक्षण केले असून लवकरच संबधित विभागाची बैठक घेतली जाईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
लोणी ता. आंबेगाव येथे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी प्रबोधिनी, पुनीत बालन समुह, शरद बँक यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर काम सुरु असलेल्या गावतळ्याच्या कार्यस्थळी काल रविवारी सायंकाळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंबेगाव शिरुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, शरद बँकचे संचालक अशोक आदक पाटील, तालुका खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक चंद्रकांत गायकवाड, सरपंच उर्मिला धुमाळ, माजी सरपंच उद्धव लंके, शिरदाळेचे उपसरपंच मयूर सरडे, पिंटू पडवळ, प्रकाश वाळुंज, बाळशीराम वाळुंज, सतीश थोरात, हनुमंत गव्हाणे, कैलास गायकवाड, मधुकर रोकडे, रंजना लंके, जयश्री रोकडे, पांडुरंग दिवटे, सुलतान शेख, निलेश पडवळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा, खडकवाडी या गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दोन आठवड्यापूर्वी गृहमंत्री श्री.वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व डिंभे धरण प्रकल्प मुख्य कार्यकारी अभियंता संभाजी माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, महसूल विभाग तसेच कृषी विभाग यांच्यामार्फत या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.