Pune News  sakal
पुणे

Pune News : प्रोडीजी पब्लिक स्कूल मध्ये मनसेचे खळ खट्याक ; १० वी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकोट न दिल्याच्या निषेधार्थ

मनसेच्या सहा जणांवर लोणीकंद पोलीसात गुन्हा दाखल... १० वी च्या काही विद्यार्थ्यांचे शुल्क बाकी असल्यानं त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट शाळेने दिले नव्हते. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्कूल च्या कार्यालयात खळ खट्याक केले.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : १० वी च्या काही विद्यार्थ्यांचे शुल्क बाकी असल्यानं त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट शाळेने दिले नव्हते. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्कूल च्या कार्यालयात खळ खट्याक केले. हा प्रकार वाघोलीतील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रोडीजी पब्लिक स्कूल मध्ये  दुपारी घडला. या प्रकरणी मनसेच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, १० वी ची सी बी एस सी ची परीक्षा सोमवार पासून सुरू झाली. प्रोडीजी पब्लिक स्कूल मध्ये अन्य शाळेचे १० वी चे सेंटर आहे. सोमवारी संस्कृतचा पेपर होता. तर मंगळवारी मराठी पेपर आहे. प्रोडीजी स्कूल च्या काही विद्यार्थ्यांना उद्या पेपर असूनही परीक्षेचे हॉल तिकीट दिले नव्हते.

ही बाब पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितली. मनसेचे पदाधिकारी स्कूल मध्ये गेले. त्यांनी तिथे कार्यालयात जाब विचारला. स्कूलच्या मुख्ध्यापिका परीक्षा हॉल मध्ये होत्या. त्या खाली आल्याच नाही. कर्मचाऱ्याबरोबर काही वेळेच्या चर्चेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सरळ कार्यालयातील काचा फोडण्यास सुरुवात केली. खुर्च्या व इतर साहीत्य उचलून फेकले.. या प्रकाराने कार्यालयातील कर्मचारी घाबरले. सर्व कर्मचारी बाहेर पडले. यानंतर मनसे कार्यकर्ते निघून गेले.

ही घटना कळताच पोलीसही पोहचले. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी रात्री उशिरा लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्मचारी युवराज हरिदास कांबळे ( वय ४०, रा. लोणीकंद ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनसेचे प्रकाश जमधडे (रा. ड्रीम संकल्प सोसायटी, वाघोली ), तुषार बबन तांबे (वय २१, . चंदननगर ) व अक्षय सूर्यवंशी व इतर तीन जण असे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे करीत आहे. दरम्यान जमधडे यांनीही शाळेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. असा लेखी अर्ज लोणीकंद पोलिसांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT