Maratha Reservation Esakal
पुणे

Maratha Reservation: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलं होतं आंदोलन

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. काल पुण्यात मराठा आंदोलकांनी मोठी जाळपोळ केली. या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जवळजवळ ४०० ते ५०० जणांवर सिंहगड रोड पोलिस स्थानकात गुन्ह्यांची नोंद केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी काल नवले पुलावर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं.

आंदोलनावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली होती. संपुर्ण रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण जाली होती. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणि गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्थानकात गुन्ह्यांची नोंद केली जात आहे.

पुण्यातील नवले पुल जाळपोळ प्रकरणात ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी दुपारी वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. दुपारी सव्वाबारा ते तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महामार्गावरील दुतर्फा रस्त्यावर कार्यकर्त्यांनी टायर, ट्यूब पेटवून दिल्या. तसेच आक्रमक घोषणा देत वाहतूक बंद केली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. शहरात जमावबंदी आदेश असताना बेकायदेशीर जमाव जमवून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम ३३६ आणि कलम ४४१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असताना काल (मंगळवारी) या आंदोलनाचे पडसाद पुणे शहरातही उमटले. शहराच्या वेगवेगळ्या भागात मंगळवारी आरक्षणाची मागणी व मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, विविध समाज घटकांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

पुणे-बंगळूर महामार्गावरील वडगाव पूल येथे आंदोलकांनी महामार्गावर टायरची जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती, त्याचा सर्वाधिक फटका रूग्ण, प्रवासी, नोकरदारांसह शालेय विद्यार्थ्यांना फटका बसला.

आंदोलकांनी टायर जाळले, तीन तास महामार्ग ठप्प

धायरी - मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता वडगाव पूल येथे महामार्ग अडविण्यास सुरवात केली. महामार्गावरील वडगाव बुद्रूक व कात्रज दरम्यानच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका आंदोलकांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली.

आंदोलकांनी टायरची जाळपोळ करून ते महामार्गावर टाकले. त्यानंतर वाहनांवर चढून 'जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर दुपारी तीन वाजता महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास सुरवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT