पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. बडतर्फ केलेल्या पोलिसांनी पुन्हा सेवेत घेण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
ललित पाटीलवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा तो पोलिसांच्या बंदोबस्तातून पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी कर्तव्यात कसूर करत पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलिस हवालदार रमेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशीव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलिस दलात समावेश करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलिस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
सात पोलिसांना करण्यात आले होते बडतर्फ...
या प्रकरणात सात जणांना बडतर्फ करण्यात आले होते. एखाद्या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पोलिस बडतर्फ केले आहेत. पाटील पळून गेला त्या दिवशी
पोलिस हवालदार आदेश शिवणकर आणि पिरप्पा बनसोडे, काळे आणि जाधव असे चौघे ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ येथे गार्ड कर्तव्यावर होते. त्यांच्यावर देखरेख अधिकारी म्हणून मोहिनी डोंगरे होत्या. तर ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी नेले होते. तिथून तो पळून गेल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तब्बल तीन तास उशिराने देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.