स्वारगेट : ''आर्थिक संघर्ष कोणाला चुकलाय, प्रत्येकाला कोणत्यातरी टप्प्यावर आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागत पण, तुमच्याकडे जर कल्पकता आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्ही याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकता''. असाच लढा दोन विद्यार्थी भावंडा देत आहे. आकाश म्हसने आणि श्रीयश म्हसने. घरची परिस्थिती हलाखीची...उदरनिर्वाहसाठी दोघांनी चहा-पोहे विकण्यास सुरवात केली. पुण्यात राहत्या रूमवरच चहा आणि पोहे बनवून अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पार्सल करून ते विकत आहेत.
आकाश, श्रीयश हे मूळचे अकोले येथील. वडील पेट्रोलपंपावर काम करतात. घरी शेती नाही त्यामुळे उत्पन्नही तुटपुंटजेच. पण दोघा भावांची जिद्द वाखण्याजोगी. ''आर्थिक परिस्थिती नसली म्हणून काय झालं? आत्ता आम्ही मोठे झालो आहोत. स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. कमीत कमी स्वतःचा खर्च तरी स्वतःच्या कमाईमधून करू शकतो'' असा विचार करून दोघांनी शिक्षण घेऊन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आकाश हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय तर त्याला अभ्यास करून आयएएस व्हायचं आहे. त्याच बरोबर श्रीयश हा अकरावीला वाडिया कॉलेजमध्ये शिकत आहे.
कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसल्याने एका बाजूला आर्थिक तारांबळ आणि दुसऱ्या बाजूला शहरातील वाढता खर्च यावर मात करताना विद्यार्थी वर्गाची बरीच तारांबळ उडते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी या दोन बंधूंनी हा छोटासा उद्योग सुरू केला आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता दोघे भावंड चहा- पोहे विकत चार पैसे कमवत आहेत. फोनवरुन चहा-पोह्यांची ऑर्डर घेऊन घरपोच पार्सल देतात. दिवसाला साधारण दीडशे कप चहा व 50 प्लेट पोहे विकले जातात. त्यामुळे दोघांचाही महिन्याचा राहण्याचा खर्च निघतो.
''आम्हाला कितीही कष्ट पडले तरी आम्हाला आमची स्वप्न पूर्ण करायची आहेत'' असं श्रीयश सांगतो. ''
''आलेल्या संकटाला तोंड देणे गरजेचे आहे. पैसे नाहीत म्हणून आपलं शिक्षण पूर्ण न करणे माझ्या दृष्टीने हा गुन्हाच आहे. कष्ट केले तर काही कमी पडत नाही. कोणत्याही उद्योग व्यवसायाला कमी लेखून चालत नाही. माझं स्वप्न आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयएएस व्हायचं आणि घरची आर्थिक परिस्थिती बदलायची आणि माझ्या सारख्या आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या तरुणांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्याचा आहे'' असे आकाश सांगतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.