पुणे : महापालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपचा निश्चित चांगला उपयोग होणार असून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी या वेळी दिली.
ऍप ची वैशिष्ट्ये
* ताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ऍपद्वारे साध्या क्लिक द्वारे करू शकतो.
*स्वतः च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोचेल. तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.
*या ऍपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूम मध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
*ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.