truck and hyva truck accident fire sakal
पुणे

Indapur Accident : इंदापूर बारामती मार्गावर ट्रक आणि हायवाचा अपघात; दोघे गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

संतोष आटोळे

इंदापूर - इंदापूर शहरापासून काही अंतरावर इंदापूर बारामती मार्गावर ट्रक आणि हायवा डंपर यांचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात डाळिंब भरून निघालेल्या ट्रकने पेट घेतला सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे जळून मोठे नुकसान झाले.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवार (ता.13) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक (क्रमांक RJ 11 GD 0431) हा फलटण येथून डाळिंब भरून बारामती मार्गे इंदापूरच्या दिशेने येत होता. दरम्यान समोरून इंदापूर कडून निमगाव कडे निघालेल्या हायवा डंपर (क्रमांक MH04 CU 5944) यांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात यामध्ये जखमी दोन्ही चालकांना उपस्थित व स्थानिक लोकांनी बाहेर काढले. यामध्ये हायवा चालकाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. दरम्यान अपघातामुळे वाहनातील वायरिंग चे शॉर्टसर्किट होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यावेळी इंदापूर नगरपरिषद व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली.

सुदैवाने वाहन चालकाना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने जीवित हानी झाली नाही. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात हलवत वाहतूक सुरळीत केली. जखमींचे जबाब घेऊन पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कोकणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT