Pravin Mane sakal
पुणे

Indapur News : विठ्ठला इंदापूर विधानसभेचा उमेदवार बदला, अन्यथा उद्रेक होईल; शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत साकडे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेत शरद पवार गटाने उमेदवारी देण्याचे संकेत दिले.

संतोष आटोळे

इंदापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेत शरद पवार गटाने उमेदवारी देण्याचे संकेत दिले. पण आता पक्षातीलच स्थानिक नेत्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला कडवा विरोध केला आहे.

ज्या ठिकाणी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला, त्याच ठिकाणी शरद पवार गटातील निष्ठावंत व सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा यांच्या सह पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने यांनी परिवर्तन मेळावा घेत शरद पवारांना विठ्ठलाची उपमा देत विठ्ठला उमेदवार बदला अन्यथा उद्रेक होईल आणि हा उद्रेक फक्त इंदापूर पुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर वाढेल असा इशारा देत विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातून उमेदवारीसाठी डावलण्यात आलेल्या व बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे वाय चेअरमन भरत शहा यांच्यासह पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी भव्य परिवर्तन मेळावा आयोजित केला होता. यावेळी मेळाव्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, मी मागील 20-25 वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. 2014 मध्ये प्रथम मला लढण्याची सूचना केली, पण नंतर थांबण्यास सांगितले. त्यावेळी मी पवार कुटुंबीयांचे ऐकले. या निवडणुकीत मी त्यांचे प्रामाणिकपणे काम केले. त्यानंतर 2019 मध्येही फसवण्यात आले.

त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटलांच्या साक्षीने यावेळी काम करा 2024 ला तुमचे काम करू असे आश्वासन दिले. त्यांना साथ दिली त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीतही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील यांची कन्या पदमाताई भोसले व भरत शहा यांच्या ताब्यात कारखाना देण्याबाबत बोलणी झाली. मात्र तेथेही लबाडी झाली. आम्हाला विचारात घेतले गेले नाही.

असा आरोप करीत तालुक्यात वर्षानुवर्षे काम करताना आमचे कुठे चुकले? असा सवाल केला. उद्याची निवडणूक परिवर्तनाची आहे. त्यामुळे आम्हाला तुमची साथ हवी आहे.कुणीही मोठा कार्यकर्ता नसताना लोकसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला 26 हजारांचे लीड दिले. शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेही तालुक्यातील जनतेवर प्रेम असेल तर त्यांनी येथील उमेदवार बदलण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी केली.

यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर चौफेर टीका करत म्हणाले, हा पट्ट्या राष्ट्रवादीच्या तंबूत घुसला आणि राष्ट्रवादीचा जुना तंबूच घेऊन निघाला आहे. यामुळे साहेब उमेदवार बदला अन्यथा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूरात होईल होणार. तर शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत विठ्ठला इंदापूरची उमेदवारी बदला. तुम्ही ज्यांना प्रवेश दिला आहे ते जर तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यांना मोदींच्या जागेवर नेऊन बसवा पण इंदापूरची उमेदवारी बदला अशी ही मागणी केली.

यावेळी भरत शहा म्हणाले, खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यात परिवर्तनाची गरज आहे. हे समोर उपस्थित जनतेने दाखवून दिले. स्व.शंकरराव पाटील, स्व. राजेंद्रकुमार घोलप यांनी नैतिकतेने राजकारण केले. मात्र इंदापूर तालुक्यातील आजी-माजी आमदार नकारात्मक राजकारण केले.म्हणून आम्ही शरद पवारांच्या साथीला आलो. मात्र आता उमेदवारीचे दिलेले संकेत याचा पवार साहेबांनी पुनर्विचार करावा. तालुक्याचे नेतृत्व नीतिमत्ते ने काम करणारे असावे. कारखान्यातील अनेक चुकीच्या धोरणांना आम्ही व्हॉईस चेअरमन असताना विरोध केला तेव्हा आमचा आवाज दाबला गेला.सत्तेपुढे काही चालत नाही.

आम्ही कुठलेही काम सत्तेसाठी किंवा पैशासाठी करीत नाही तर जनतेच्या हितासाठी करत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान या सभेला विक्रमी प्रतिसाद मिळाला.यामुळे आगामी काळात इंदापूर विधानसभेची लढत अधिकच रंगदार होणार असल्याचेही दिसत आहे.

यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले,या मेळाव्याला जमलेले गर्दी, म्हणजे इंदापूर तालुक्याच्या विकासाला हाथ देण्यासाठी आणि परिवर्तनला साथ मिळणार आहे. अशीच साथ, आशीर्वाद दिला तर तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,तुमचे सेवक म्हणून काम करू अशी ग्वाही दिली.

यावेळी दत्तात्रय फडतरे, तुषार जाधव, बाबासाहेब चवरे, कांतीलाल झगडे बाळासाहेब हरणावळ, रवीराज भाळे, विजया कोकाटे, अमोल मुळे, योगेश जगताप, भांडवलकर, शकील सय्यद, बबन लावंड यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सूत्रसंचालन..तर आभार अमोल भोईटे यांनी मानले.

परिवर्तन मेळावा ठरला वैशिष्ट्यपूर्ण..

इंदापूर शहरात आयोजित हा परिवर्तन मेळावा वैशिष्ट्यपूर्ण ठरला यामध्ये मेळाव्याच्या सुरुवातीलाच वरुनराजाची हजेरी लावली. मेळाव्याला व्यासपीठासह समोरही विक्रमी प्रतिसाद मिळाला यामुळे प्रमुख मान्यवरांनी व्यासपीठावरील खुर्च्यांवर न बसता व्यासपीठावरच बैठक मारली. या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थित पाहायला मिळाली. अजाण सुरू असताना प्रवीण माने यांनी भाषण थांबवत सामाजिक एकतेचा संदेश दिला तर यावेळी उद्योगपती रतन टाटा यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT