शेततळ्यासाठी नित्कृष्ट दर्जाचा कागद मिळाल्याने शेततळ्याची गळती झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची तक्रार इंदापूर येथील शेतकरी भागवत बाजीराव देवकर यांनी ग्राहक न्यायालयाकडे केली होती.
इंदापूर- शेततळ्यासाठी नित्कृष्ट दर्जाचा कागद मिळाल्याने शेततळ्याची गळती झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची तक्रार इंदापूर येथील शेतकरी भागवत बाजीराव देवकर यांनी ग्राहक न्यायालयाकडे केली होती. तक्रारीची दाखल घेऊन ग्राहक न्यायालयाने गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड आणि विहान इंटरप्राईजेस यांना संयुक्तरित्या १ लाख ५५ हजार २१६ रुपये एवढी रक्कम देण्याचा आदेश दिला. (Maharashtra Pune Latest News)
देवकर यांनी २०१७ साली जमीन गट नं. ६७/१/ब मध्ये शेततळे खोदल्यानंतर आवश्यक कागद २६ डिसेंम्बर २०१७ रोजी गुजरात काफ्ट इंडस्ट्रीजलिमिटेड आणि डिलर विहान इंटरप्रायजेस डुडुळगांव ( ता. हवेली, जि. पुणे ) येथून खरेदी केला. प्रोप्रायटर गणेश वाबळे आणि के.डी. कांबळे यांच्या मार्फत ही खरेदी करण्यात आली होती. तो जोडून देण्याची जबाबदारी वितरकाची होती. पण, सदर कागद निकृष्ठ दर्जाचा असल्याने तयार केलेले शेततळ्याची वेळोवेळी गळती झाली. यामुळे देवकर यांचे नुकसान झाले. देवकर यांनी यासंदर्भात अनेकवेळा गुजरात काफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड व कंपनीचे अधिकृत वितरक विहान इंटरप्रायजेस यांना समक्ष भेटून, फोन, ई मेल व अर्ज करून याची माहिती दिली. त्याची दखल कंपनी अथवा डिलर यांनी न घेतल्याने शेवटी देवकर यांनी पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रितसर तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली.
ग्राहक न्यायालयाने दोन्ही पक्षांना संधी देवून पुराव्या अंती गणेश वाबळे आणि के.डी. कांबळे यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या देवकरयांचा मायकॉन पेपर स्विकारल्याच्या दिवशी रक्कम रुपये १,२७,२१६/- द्यावेत तसेच नुकसान भरपाई म्हणून २५ हजार व तक्रारीचा खर्च ३ हजार अशी एकूण १ लाख ५५ हजार २१६ रुपये एवढी रक्कम देण्याचा आदेश दिला. यावेळी देवकर यांच्यातर्फे ऍड राकेश शुक्ल यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.