इंदापूर : राज्यात इंदापूर तालुक्यास डाळिंबाचे आगार मानले जाते तर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब व मत्स्य बाजाराचे देशभर नाव आहे. इंदापुरच्या डाळिंबाची भुरळ योग गुरू रामदेव बाबा यांना देखील पडलीआहे. या बाजार समितीच्या डाळिंब बाजारात मागील पंधरा दिवसात ८२ हजार कॅरेट डाळिंबाची विक्रमी आवक होवून २ कोटी ९० लाख रुपयांची उलाढाल झाली तर दर्जेदार डाळिंबास प्रति किलो १५१ रुपये इतका दर मिळाला. त्यामुळे कोरोना महामारीत अर्थकारण ठप्प झाले असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
सध्या ढोबळी मिरची, कोथिंम्बिर, फ्लॉवर, कोबी, शेपूचे दर पडले आहेत.मेथीसमागणी आहे मात्र वातावरणामुळे मेथीजळण्याचेप्रमाण वाढले आहे. पेरू व केळीस समाधानकारक दर आहेत. त्यापार्श्वभूमीवर या पंधरवड्यात डाळिंबाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी तालुक्यात १६ हजार हेक्टरवर डाळिंबाचे पीक होते. मात्र वातावरणात होणारे बदल, डाळिंबावर येणारे मर सारखे आजार ,अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड निम्याने कमी केली.मात्र बाजार समितीच्या चोख आर्थिक व्यवहारामुळे परिसरातील सहा तालुक्यातून डाळिंब इंदापूर बाजारात येत असल्याने आवक वाढली. हे डाळिंब दिल्ली, हैद्राबाद, रायबरेली,मुंबई, विजयवाडा, पुणे येथील बाजारपेठेत विकली जात आहेत. या डाळिंबास किमान १० ते १५१ रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना
दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी तर बाजार समिती अद्यावतीकरण माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. डाळिंब बाजार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. या बाजार समितीस राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील मदत केली आहे. मावळते सभापती आप्पासाहेब जगदाळे व विदयमान सभापती दत्तात्रय फडतरे ,उपसभापती तथा मोहोळचे आमदार यशवंत माने, संचालक शिवाजीराव इजगुडे, मधुकर भरणे, मेघश्याम पाटील, भाऊसाहेब सपकळ ,सुभाष दिवसे, महावीर शहा, संग्रामसिंह निंबाळकर व संचालक मंडळाने शेतकऱ्यांना आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने बाजार समिती शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे.
गत वर्षी झालेल्या ढगफुटीमुळे डाळिंब बागांना फटका बसून उत्पादन ३० ते ३५ टक्केकमी झाले तर वातावरणात झालेल्या बदलामुळे डाळिंबावर मर, फळकुज, तेल्या,डांबऱ्या व इतर बुरशीजन्य विकार वाढले.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बागा कमी कराव्या लागल्या तर रोगामुळे डाळिंबाचे भाव घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीने डाळिंबासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन उपलब्ध करून दयावे तसेच तालुक्यात डाळिंब प्रक्रिया उद्योग सुरू करावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून बाजार समितीने पुढाकार घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
इंदापूर बाजार समितीत पंढरपूर, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, माळशिरस, दौंड, माढा तालुक्यातून डाळिंबाची आवक होत असून डाळिंबाना प्रतवारीनुसार किमान १० ते कमाल १५१ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या माध्यमातून सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे बाजार समितीचे सचिव वैभव दोशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.