इंदापूर - इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे महागाई विरोधी आंदोलनात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीसविजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद साबळे म्हणाले , केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर या जीवनावश्यक वस्तूंची दर वाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीसधरले आहे. काँग्रेसच्या काळात ६५ रुपये प्रति लिटर पेट्रोल असताना स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आज पेट्रोल १२१ प्रति लिटर झाले असून त्या केंद्रीय मंत्री म्हणून मंत्री मंडळात काम करत आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगड्या पाठवतील का? असा सवाल त्यांनी केला. सर्वसामान्य जनता उपाशी तर केंद्र सरकार तुपाशी आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता मोदी यांना त्यांची जागा निश्चित दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत, इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादार,इंदापूर युवकसरचिटणीस संदीप शिंदे, अनिकेत जाधव, योगेश सुतार सिद्धार्थ गायकवाड व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.