Independence Day 2023 15 August celebration musical concert Pune FIR singer Uma Shanti 
पुणे

Independence Day: पुण्यात म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान; गायिकेनं प्रेक्षकांमध्ये भिरकावला तिरंगा

याप्रकरणी गायिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Independence Day 2023 : पुण्यात एका म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी घटना समोर आली आहे. गायिकेनं तिरंगा झेंडा प्रेक्षकांमध्ये भिरकावल्यानं हा अवमान घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

याप्रकरणी संबंधित गायिकेवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली होती. (Independence Day 2023 15 August celebration musical concert Pune FIR singer Uma Shanti)

पबमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट

सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्याचं उपनगर मुंढवा इथल्या एका पबमध्ये रविवारी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गायिका उमा शांती हिच्या गाण्याचा कार्यक्रम सुरु होता.

यावेळी गायिकेच्या दोन्ही हातांमध्ये तिरंगा झेंडा होते, यावेळी उत्साहाच्याभरात गायिका उमा शांती हीनं तिरंगा झेंडा प्रेक्षकांमध्ये भिरकावला. तिची ही कृती राष्ट्रध्वज हाताळण्याच्या आचारसंहितेत बसणार नव्हती. (Latest Marathi News)

बँडवर गुन्हा दाखल

तिच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर अॅड. अशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ज्या बँडकडून या म्युझिकल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या 'शांती पिपल' बँडसह गायिका उमा शांती हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

उद्या देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे या पार्श्वभूमीवरच राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे अपमान झाल्यानं सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT