india and africa peace campaign sakal
पुणे

Peace Campaign : शांती मोहीमांसाठी ‘भारत-आफ्रिका’ सज्ज; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

वसाहतवादी राजवटींपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत आणि आफ्रिकेने अविरत संघर्ष केला आहे. त्यामुळे आमच्यातील आत्मीयतेची आणि एकतेची भावना विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच आहे.

सकाळ वृत्तसेवा

वसाहतवादी राजवटींपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत आणि आफ्रिकेने अविरत संघर्ष केला आहे. त्यामुळे आमच्यातील आत्मीयतेची आणि एकतेची भावना विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच आहे.

पुणे - वसाहतवादी राजवटींपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत आणि आफ्रिकेने अविरत संघर्ष केला आहे. त्यामुळे आमच्यातील आत्मीयतेची आणि एकतेची भावना विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गदर्शनाखाली भारत आणि आफ्रिकेचे सैन्य जगात शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी वचनबद्ध आहेत, अशी ग्वाही भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिली.

भारत-आफ्रिकेचा संयुक्त लष्करी सराव अर्थात ‘द आफ्रिका-इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज’चे (एफंडेक्स २०२३) औंध येथे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप प्रसंगी जनरल पांडे बोलत होते. या बहुराष्ट्रीय सरावात १२४ सहभागींसह आफ्रिकन खंडातील एकूण २५ राष्ट्रे आणि भारतीय सैन्याच्या शीख, मराठा आणि महार रेजिमेंटने भाग घेतला होता. पांडे म्हणाले, ‘संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहीमांमुळे दुभंगलेल्या देशांत चिरस्थायी शांतता निर्माण होत आहे. अशा मोहिमांसाठी दोन्ही सैन्यांतील समन्वय वाढावा आणि सर्वोत्तम कार्यपद्धती विकसित करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता. संयुक्त सरावामुळे दोन्ही देशातील मैत्रीला चालणा मिळाली आहे.’

लष्करी संबंध दृढ करणे, एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे, संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवतावादी माइन अ‍ॅक्शन आणि शांतता मोहीमांची अंमलबजावणीसाठी संयुक्त क्षमतेला प्रोत्साहन देणे, हे या सरावाचे उद्दिष्ट होते. सरावाच्या पार्श्‍वभूमीवर एक ‘उपकरण प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उत्पादित ३२ उद्योगांमधील ७५ स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले. आफ्रिकन लष्कर प्रमुख, प्रमुखांचे प्रतिनिधी आणि आफ्रिकन राष्ट्रांचे सहभागीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT