Information provided by drdo Pradeep Kurulkar is not confidential defense adv rishikesh ganu objection taken on hearing Sakal
पुणे

Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकरने दिलेली माहिती गोपनीय नाही; बचाव पक्षाचा दावा, सुनावणीवर घेतली हरकत

ती सर्व माहिती सार्वजनिक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असा दावा डॉ. कुरुलकर याचे वकील ॲड. ॠषीकेश गानू यांनी केला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरने याने पाकिस्तानी हेराला पाठविलेली माहिती गोपनीय नाही.

ती सर्व माहिती सार्वजनिक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असा दावा डॉ. कुरुलकर याचे वकील ॲड. ॠषीकेश गानू यांनी केला आहे. सर्वत्र उपलब्ध असलेली माहिती सुनावणी दरम्यान जनतेसमोर खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोचेल, अशी स्थिती नाही.

त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात येवू नये, असे नमूद करीत ॲड. गानू यांनी ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेण्यावर हरकत नोंदवली. डॉ. कुरुलकरने ‘ब्राह्मोस’ आणि ‘अग्नी’ अशा क्षेपणास्त्रांची दिलेली गोपनीय माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नाही.

ही माहिती अत्यंत संवेदनशील आहे. सुनावणी दरम्यान ही माहिती जनतेसमोर खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोचवू शकते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज सरकारी वकील विजय फरगडे यांनी २९ ऑगस्टला सादर केला होता. त्यावर सोमवारी (ता.४) झालेल्या सुनावणी दरम्यान ॲड. गानू यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ सप्टेंबरला होणार आहे.

गोपनीय कागदपत्रे मिळण्यासाठी बचाव पक्षाचा अर्ज

डॉ. कुरुलकर याच्याकडे केलेली चौकशी आणि तपासातून पुढे आलेली माहिती याचे गोपनीय कागदपत्रे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात सादर केले आहेत. ही गोपनीय कागदपत्रे मिळावीत, असा अर्ज ॲड. गानू यांनी सोमवारी न्यायालयात केला. त्या अर्जावर सरकारी वकील फरगडे यांनी हरकत घेतली.

त्यासंदर्भातील लेखी म्हणणे (से) त्यांनी न्यायालयात सादर केले आहे. हे प्रकरण सध्या जामिन अर्जाच्या सुनावणीच्या टप्प्यावर आहे. पुढील सुनावणीच्या वेळेस कायदेशीर तरतुदींनुसार ही गोपनीय कागदपत्रे बचाव पक्षाला देण्यात येतील, असे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या लेखी म्हणण्यात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT