पुणे

पुण्यात पशु पक्ष्यांसाठी धावले प्राणीमित्र

उपासमार रोखण्यासाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट : गेल्या वर्षभरात लॉकडाऊन (Lockdown) काळात रस्त्यावरील पशू, पक्षी आणि भटक्या जनावरांची अन्नासाठी (stray animals) प्रचंड हाल होत आहेत. कित्येक प्राणी अक्षरशः अन्न, पाण्याविना मरण पावले आहे. या प्राण्यांना वाचविण्यासाठी पुण्यातील काही पक्षी- प्राणीमित्रांनी(Birds-Animal Lover) पुढाकार घेतला आहे. मुक्या जनावरांना अन्न मिळावे, त्यांच्यावर योग्य औषध उपचार व्हावे यासाठी त्यांनी फरी टेल्स एनजीओची स्थापन केली आहे. (Initiative to save birds and animals by animal lovers in Pune)

पुण्यातील हनुमान टेकडी, पर्वती,तसचे काही नदी काठी आणि जिथे पक्षी दिसतील तिथे त्यांना खायला देतात. पक्षांसाठी आवश्यक गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, पोहे असे धान्य देतात. तसेच त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची सोय सुद्धा करतात. भडक्या प्राण्यांसाठी बिस्कीटचे पुडे, कॅट फूड, डॉग फूड देतात. लॉकडाऊनच्या कडक नियामावलीमुळे कित्येकदा प्राणीप्रेमी प्राण्यांसाठी आवश्यक गोष्टी सोबत घेऊन फिरतात. रस्त्यावर बऱ्याच वेळा अपघातग्रस्त, अनेक व्याधींनी त्रस्त असे पक्षी-प्राण्यांवर योग्य उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचे काम हे प्राणीप्रेमी करतात. पक्षी-प्राण्यांसाठी फुड डोनेशन कॅम्प अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन असे विविध प्रकारचे उपक्रम देखील राबविले जातात

''मुक्या जनावरांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्यावर योग्य ते औषध उपचार करण्यासाठी आम्ही काम करतोय'' अशी माहिती सकाळशी बोलताना फांउनडेशनच्या अध्यक्षा मेधा नावडीकर यांनी दिली. ''लोकांनी आपली भारतीय प्राणी पाळावेत जसे की कुत्री ,मांजरी या साठी आम्ही सदैव लोकांमध्ये जनजागृती करतो. मांसाहार सोडून लोकांनी मोठ्या प्रमाणावर शाकाहारी बनावे यासाठी पण आम्ही जनजागृती करतो.आम्ही मुक्या जीवांची अन्नासाठी परवड होऊ नये म्हणून त्यांची मनोभावे सेवा करणे हे आमचे ध्येय आहे. गेली दहावर्षाहून अधिक काळ भटक्या मुक्या प्राण्यांसाठी काम करत असून योग्य ती काळजी घेत आम्ही आहोत. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT