Inspection will be done before grants are given to schools aOperated a team to inspect schools 
पुणे

शाळांना अनुदान देण्यापूर्वी होणार तपासणी; पथक कार्यन्वित

सकाळवृत्तसेवा

पुणे : अनुदान पात्र आणि अनुदान मंजूर केलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची अनुदाना वितरित करण्यापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदानास पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदान सुरू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र शाळांना हे अनुदाना देण्यापूर्वी शिक्षण आयुक्त यांच्यामार्फत मूल्यांकनाच्या प्रस्तावाची तपासणी करण्याच्या निर्णय ऑक्टोबरमध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या तपासणीसाठी पथक नेमण्यात आले असून शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव झ. मु. काझी हे पथक प्रमुख असणार आहेत. कक्ष अधिकारी ल. वि. सावंत, सहाय्यक कक्ष अधिकारी वि. ग. आव्हाड यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) हे या तपासणी पथकातील सदस्य असणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
 
हे पथक अशी करणार तपासणी :
- शाळेची शैक्षणिक गुणवत्ता.
- संच मान्यतेनुसार मंजूर पदे पाहणे.
- शाळेची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये भरली आहे का पाहणे.
- बायोमेट्रिक प्रणाली, १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहे का हे तपासणे.
- माध्यमिक शाळांचा १०वीचा आणि उच्च माध्यमिक शाळांचा १२वीचा निकाल पाहणे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही', पंकजा मुंडे असं का बोलल्या? भाजपचंच राजकारण की..?

Champions Trophy 2025: 'काहीही झालं तरी स्पर्धा दुसरीकडे हलवू देऊ नका' पाकिस्तान सरकारचे बोर्डाला आदेश

Rohit Pawar : महाआघाडीच्या १७० जागा येणार निवडून; ‘स्ट्राईक रेट रेकॉर्ड’ तोडणार : रोहित पवार

Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

Cherry Blossoms: भारतातील 'या' ठिकाणी घेऊ शकता 'चेरी ब्लॉसमचा' आनंद, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT