पुणे - सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठीचे अर्ज २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना भरता येतील. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे यंदाचे ६५ वे वर्ष आहे. फाउंडेशनतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून एक लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे भारतात पीएचडी करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये अशा ५० शिष्यवृत्त्या देण्यात येतील.
ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२४-२५) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये ‘पीएचडी’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०२२ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे, राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील.
बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षात किंवा त्या आधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा ‘पीएचडी’चे शिक्षण घेणाऱ्या तसेच वरील पात्रता अट पुरी करणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांस रुपये १० हजार रुपये परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केले जातील. असे सर्व पात्र विद्यार्थी फाउंडेशनच्या खालील वेबसाइट वरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून (२००९-१०) कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेश पत्र प्राप्त झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘केळकर शिष्यवृत्तीसाठी’ अर्ज करावा, असे आवाहन सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
वेबसाइट - www.sakalindiafoundation.com
या वेबसाइटवर शिष्यवृत्तीचे अर्ज ८ मे ते २५ जून २०२४ या कालावधीत उपलब्ध असतील
अधिक माहितीसाठी संपर्क : सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ ऑफिस बिल्डिंग, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२
संपर्क क्रमांक : ०२० ६६०३५९३५
ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org / sakalindiafoundation@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.