c
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांनी ही माहिती दिली. घनवट यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, लोणावळ्याजवळ वाकसई येथील कौशल जगदीश राजपुरोहीत यांचे मालकीच्या इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर १५ मध्ये असणारा सुरावत व्हिला नावाच्या बंगल्यामध्ये विनोद सुभाषचंद्र राय ( रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी, विरार, ठाणे) हा व त्याचे सहकारी हे संगणक व मोबाईल सॉफ्टवेअर वरून व्हॉईसमेल व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अमेरिकेतील लोकांची फसवणूक करून त्यातून बेकायदेशीरपणे हवालाकरवी पैसे जमा करीत आहेत. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने छापा टाकत कारवाई केली.
अभिनव दिपक कुमार (रा. कन्हैया भैरव रेसीडेन्सी, मीरा रोड, ठाणे), निनाद नंदलाल देवळेकर (रा. शिवसुंदर कॉम्प्लेक्स, बदलापूर, ठाणे), राकेश अरुण झा (रा. इमरल्ड हाईटस् मानसरोवर, नवी मुंबई), शंतनू शाम छारी (रा. गौरवसिटी, कनाकिया, मिरा रोड, मुंबई), दीप प्रिन्स चक्रवर्ती (रा. साई सिटी कॉम्प्लेक्स, नालासोपारा, ठाणे), निलेश वेलजी पटेल (रा. सुर्याकुमार सोसायटी, कुरार, मालाड ), विनोद सुभाषचंद्र राय (रा. इव्हरशाईन ग्लोबल सिटी, विरार , ठाणे), शाहीद शोएब खान (रा. शांति निकेतन कॉम्प्लेक्स, मिरा भाईंदर), इम्तेखाब निजामुद्दीन शेख (रा. अजिमनगर, मालवणी, मालाड), गौरव देवेंद्र वर्मा ( रा. कल्पतरू सोसायटी, बोरिवली) , बाबू राजू सिंग (रा. निरव पार्क, भारती पार्क, मिरा रोड, ठाणे), विनायक धनराज उचेडर ( रा. ठाकूर गाव, कांदीवली, मुंबई), अभिषेक संजय सिंग ( रा. साई विकास अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे ), मोहम्मद अख्तरहुसेन मिर्झ (रा. चंद्रेश छाया लोढा कॉम्प्लेक्स, मिरा रोड, ठाणे), शैलेश संजय उपाध्याय ( रा. कुरार गाव, मालाड, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.जुलै २०२० पासून संगनमताने वाकसाई येथे सदर प्रकार सुरू होता.
इंटरनेट व संगणक तसेच मोबाईल फोन व सॉफ्टवेअरचा उपयोग करून अमेरिकन नागरिकांचा मोबाईल फोन नंबर, नांव व इतर माहिती बेकायदेशीर रित्या प्राप्त करून संकलित करून त्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा खोटा व्हाईस मेल पाठवत. व त्यांना गिफ्टस् कुपन आरोपींना देण्यास भाग पाडत.
निरीक्षक घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, सहा फौजदार विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सुनिल जावळे, सूर्यकांत वाणी, प्रमोद नवले, मुकुंद अयाचित, विदयाधर निवीत, दत्तात्रय तांबे, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, प्रसन्न घाडगे, अक्षय नवले, अक्षय जावळे, दगडू वीरकर यांच्या पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकत याच बंगल्याच्या आवारात बेकायदा ४३० ग्रॅम वजनाची व ६ हजार रुपये किंमतीची सात गांज्याची झाडे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता लागवड केल्याप्रकरणी जागा मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.