Kalyaninagar Pune Accident sakal
पुणे

Kalyaninagar Pune Accident : अपघाताची चौकशी करा, पब संस्कृती बंद करा;‘आप’ची मागणी, येरवड्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : संगणक अभियंता तरुण आणि तरुणीच्या अपघाताची, आरोपीला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंटची चौकशी करून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, यासाठी कठोर कलमांचा वापर करावा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने आज येरवडा पोलिस ठाण्यात आंदोलन केले.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, कार्याध्यक्ष अजित फाटके, युवा शहराध्यक्ष अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, किरण कद्रे आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपघातानंतर आरोपीला पोलिस ठाण्यात मिळालेली वागणूक आणि फिर्यादींना झालेला त्रास या गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यात आला.

येरवडा पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात धरले आणि मागण्यांचे निवेदन पोलिस अधिकाऱ्यांना दिले. सुदर्शन जगदाळे म्हणाले, ‘‘पुण्यातील दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू दुर्घटना ही भाजपच्या नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि गृहमंत्री यांच्या अवैध धंद्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. पुण्यातील गुंडगिरी, पब, रेस्टोबार ही संस्कृती भाजपने वाढवली आहे. ’’

अजित फाटके म्हणाले, ‘‘पैशांच्या जोरावर आरोपींना वाचवण्यासाठी यंत्रणेने जी तत्परता दाखवली, ते वास्तव महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी घातक आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT