Investment Sakal
पुणे

लग्नखर्चात बचत करून नवदांपत्याकडून गुंतवणूक

कोरोनामुळे लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नको, असा राज्य सरकारचा सध्याचा नियम आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) लग्नात (Marriage) उपस्थितीवर राज्य सरकारने (State Government) घातलेली बंधने (Restriction) वधू-वरांच्या पथ्यावर पडत असून अनेकांनी वाचलेल्या पैशांतून भविष्यासाठी (Future) तरतूद केली आहे. सोने, शेअर्स किंवा व्यवसाय-धंद्यात त्यांनी पैसे गुंतविण्यास (Investment) सुरुवात केली आहे. (Investment from Newly Weds by Saving on Wedding Expenses)

कोरोनामुळे लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नको, असा राज्य सरकारचा सध्याचा नियम आहे. त्यामुळे या नियमानुसारच लग्नसमारंभ होत आहेत. जास्त उपस्थिती असल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्यामुळे उपस्थितीबाबतचा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे. त्यामुळे लग्नात होणाऱ्या खर्चावरही आता बंधने आली आहेत. एरवी लग्नासाठी लाखो रुपये खर्च होतो. परंतु, आता साधेपणाने लग्न समारंभ करण्यावर भर दिला जात आहे. मंडप किंवा मंगल कार्यालय, केटरिंग, वाहनांचा ताफा किंवा वाजंत्री (डिजे) या खर्चिक गोष्टी नागरिक टाळू लागले आहेत. मात्र, सोने व मर्यादित कपडे खरेदीत मात्र बदल झालेला नाही. कोणत्याही प्रकारचा मानापमान, रुसवाफुगवी न होता प्रत्येक जण लग्न समारंभात एकमेकांना सांभाळून घेत असल्याचेही दिसून येत आहे. लग्नासाठीचा टळलेला खर्च आता नवविवाहित जोडपी मुदत ठेवींमध्ये गुंतवत आहेत. भविष्य निर्वाह निधी किंवा म्युचुअल फंडामध्येही पैसे गुंतविलेले जात आहेत. तर काहींनी नोकरी किंवा व्यवसायासाठी त्या खर्चाचे नियोजन केले आहे.

नवविवाहिता अंकिता जाधव म्हणाल्या, ‘कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर डिसेंबरमध्ये माझे लग्न झाले. आम्ही दोघेही नुकतेच जॉबला लागलो, त्यामुळे नोंदणी पद्धतीने लग्न केले. अशा पद्धतीच्या लग्नामुळे आम्ही खूष आहोत. कारण, बराच खर्च टळला. ते पैसे भविष्यासाठी आम्ही ठेवले आहेत.’ मात्र जुनी पद्धत रूढ व्हायला नको, असेही त्यांनी सांगितले.

नुकताच विवाह झालेले भूषण खैरनार म्हणाले, ‘माझे लग्न ७ जूनला झाले. लग्न समारंभपूर्वक करण्याची इच्छा होती, परंतु निर्बंधामुळे साधेपणाने केले. राहिलेल्या पैशांत बायकोचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतठेव केली आहे.’

२४ फेब्रुवारीला माझे लग्न गावाकडे झाले. छोटा मंडप टाकून दारापुढे लग्न लावले. एकूण ६० हजार खर्च झाला. बाकी गोष्टींवरचा खर्च वाचला. लग्न सुटसुटीत झाले. वाचलेले पैसे आता पुढील आयुष्यासाठी उपयोगी पडतील.’’

- विकास मांजरे, नवविवाहित

आम्ही २७ मे रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले, त्यासाठी केवळ अडीच हजार रुपये खर्च आला. अनावश्यक खर्च टळला. दोघांच्या पैशांत बचत झाली. वाचलेले पैसे आम्ही व्यवसायात गुंतवले आहेत.

- अनिता जाधव, नवविवाहिता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT