हडपसर : पुणे सोलापूर महामार्गावर रवी दर्शन चौकाला काल झालेल्या पावसात दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात तळ्याचे स्वरूप आले होते esakal
पुणे

Pune Rain News : हडपसर परिसरातील पावसाळी वाहिन्यांचा प्रश्न याही वर्षी ऐरणीवर

Rain Update : पाणी चिखलातून प्रवास करताना विद्यार्थी कामगार व इतर प्रवाशांना करावी लागते कसरत

कृष्णकांत कोबल

Pune : सध्या होत असलेला अवकाळी पाऊस व त्यामुळे ठिकठिकाणी साचत असलेल्या तळ्यांनी हडपसर परिसरातील पावसाळी वाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. येथील काही ठिकाणांवर गेली अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याची तळी साचत असतात. या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करण्यास पालिका आजही असमर्थ ठरत आहे आहे. त्यामुळे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या कौशल्यावर नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहत असते. दरवर्षी त्याच ठिकाणी ही समस्या निर्माण होत असतानाही पालिकेला हा प्रश्न मुळापासून सोडवण्यात यश आलेले दिसत नाही. दुरुस्तीचे काम करूनही साचलेल्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात कायम येथून कसरतच करीत प्रवास करावा लागत आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर रवी दर्शन येथे दरवर्षी मोठ्या पावसात पाणी साचल्याची घटना घडते. मांजरी फाट्यावरील इंद्रप्रस्थ सोसायटी जवळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालया शेजारी व मागील बाजूलाही साचलेल्या पाण्याचा प्रश्न कायमचा झालेला आहे. गेल्या वर्षी दुरुस्ती करूनही हा प्रश्न आजही निर्माण होत आहे.

डीपी रस्त्यावरील क्रीडा संकुल, साडेसतरानळी माळवाडी रस्ता चौक, सोलापूर रस्त्यावरील अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती, गोंधळेनगर येथील करकरे उद्याना समोरील भाग, सय्यदनगर रेल्वेगेट लगतचा हांडेवाडी रस्ता, ससाणेनगर, मगरपट्टा सिटी मागील रस्ता व कोद्रे उड्डाणपूलाच्या सुरुवातीला, महंमदवाडी गावठाणा जवळ या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचलेले दिसते. यातील तीन-चार ठिकाणी पाणी पाऊस संपल्यानंतरही कायम राहते. तेथे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असतो

पाणी चिखलातून प्रवास करताना विद्यार्थी कामगार व इतर प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. छोटे मोठे अपघातही त्यामुळे होत असतात. दरवर्षी ही समस्या निर्माण होत असताना तालुका प्रशासन त्याबाबत गांभीर्याने का घेत नाही, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, सामाजिक कार्यकर्ते समीर वाडकर, दत्ता पाटील, शैलेंद्र बेल्हेकर, पितांबर धीवार, शीतल ससाणे आदींनी केला आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT