Sharad Pawar Sakal
पुणे

आरक्षणामुळेच महिलांना स्वतःच्या कतृत्वाचा ठसा उमठविता आला - शरद पवार

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व यशदा पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शारदानगर येथे आयोजित महिला निवासी सरपंच प्रशिक्षण समारंभात शरद पवार बोलत होते.

कल्याण पाचांगणे

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व यशदा पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शारदानगर येथे आयोजित महिला निवासी सरपंच प्रशिक्षण समारंभात शरद पवार बोलत होते.

माळेगाव - 'कर्तृत्व हे पुरुषाकडेच (Man) असते असे नाही ते स्त्रीकडेही (Women) असते. समाजात कोणत्याही कामात स्त्रीला संधी मिळाली तर तिच्या हातून चांगलं काम होते, ही भावना मनात ठेवून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना विधानसभेत महिला आरक्षणाचा (Reservation) मुद्दा मांडला आणि तो मंजूर (Sanction) करून घेतला. अर्थात आरक्षणामुळे महिलांना स्वतःच्या कतृत्वाचा ठसा उमठविता पुढे येत आहेत, याचा मला मनस्वी आनंद होत आहे,` असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत केले.

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व यशदा पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शारदानगर येथे शनिवार (ता. १९) रोजी आयोजित महिला निवासी सरपंच प्रशिक्षण समारंभात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमात पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद येथील अनेक महिला सरपंच उपस्थित होत्या. तसेच यावेळी यशदा उपसंचालक श्री. बी. एम. वराळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, सत्र समन्वयक एस. डी. बिराजदार, आर. टी. दीघडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, संतोष गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पवार यांनी महिलांना समाजकारण व राजकारणातले सल्ले देताना स्वतःच्या जीवनातले अनुभव सांगितले. ते म्हणाले, `'ग्रामविकासाच्या कामात वाद होतात, पण चांगल्या पारदर्शक काम करायचे असल्यास कधीच ताडजोड करायची नाही.

सरपंच म्हणून मिळालेले अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्याची जानिव मनात राहिली पाहिजे. गावातील प्राथमिक शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, स्थानिक प्रश्न याबाबतचे निर्णय पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी एकत्र बसून घ्यावेत. गावाचा विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे. लोकांची कामे झाली तर लोक तुम्हाला पुन्हा सत्ता व पद आणि कामाची संधी देतात. मी 1967 साली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी मी प्रत्येक घरात जाऊन प्रचार केला. पुढे लोकांनी मला काम करण्याची संधी दिल्यानंतर काम करत राहिलो. याच कामाच्या जोरावर आजपर्यंत 14 पंचवार्षिक कामाच्या जोरावर बारामतीत शेवटची एक सभा घेतो आणि लोक मला निवडून देत आहेत. याचाच अर्थ आपण लोकांची काम केली तर लोक आपल्याला विसरत नाहीत.` यावेळी महिलांनीही पवार यांना अनेक प्रश्न विचारत मनातील शंकाचे निरसन केले. ग्रामविकासाच्या कामात पवारसाहेब आपण केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयोगी येईल, असे असे मत आशा शितोळे यांनी मांडले.

आणि संसद रत्न पुरस्कार मिळाला..!

'महिलांना भाषण करता आले पाहिजे, आपले मत व्यक्त करता आले पाहिजे. माझ्या घरात माझी मुलगी सुप्रिया बारामतीच्या खासदार यांनासुद्धा सुरुवातीला बोलता येत नव्हते, पण काम करत राहिली आणि आज तिला लोकसभेत 3 वेळा संसद रत्न हा पुरस्कार मिळाला आहे. हे केवळ अथक परिश्रमाने शक्य होते,`` अशी माहिती शरद पवार यांनी सांगताच महिलांनी टाळ्या वाजवत सुप्रिया सुळे यांच्या कतृत्वाचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT