thief 
पुणे

Crime News : साक्षात पांडुरंगानेच घरातील ऐवज वाचवला

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : थोरांदळे (ता.आंबेगाव) गावातील दिंडी समवेत गेलेल्या दोन वारकऱ्यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवार (ता.०५) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली,पण चोरट्यांच्या हाती काही लागले नाही,पण जयराम खरमाळे यांच्या घरातील दोन कपाटे फोडली पण तिसरे कपाट काही चोरट्यांना फोडता आले नाही आणि सोन्याचा ऐवज वाचला साक्षात पांडुरंगानेच घरातील ऐवज वाचवला असल्याचे बोलले जात आहे.

थोरांदळे गावठाणानजीक पूर्वेला खरमाळे वस्ती असून येथील जयराम भिमाजी खरमाळे व कैलास सुदाम टेमगिरे हे दोन्ही कुटुंबातील नवरा बायको हे बऱ्याच वर्षांपासून गावातील दिंडी समवेत आषाढीवारी निमित्त पंढरपूरला जात असतात,यंदा ही दोन्ही कुटुंबे गावातील दिंडी समवेत पंढरपूरला वारी साठी गेले आहे.दोन्ही कुटुंबे वारीला गेल्याने घरांना कुलूपे होती,याचाच फायदा चोरट्यांनी घेत शुक्रवार (ता.०५ ) रोजी पहाटे घरांच्या दरवाजांची कुलूपे तोडून आत प्रवेश केला.जयराम खरमाळे यांच्या घरातील दोन कपाटे फोडली पण तिसरे कपाट काही चोरट्यांना फोडता आले नाही आणि सोन्याचा ऐवज वाचला त्यानंतर कैलास टेमगिरे यांच्या घरात प्रवेश केला.त्यांच्या घरामधील दोन कपाटे उचकली.परंतू त्यांना काही मिळाले नाही.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे मनोहर खरमाळे हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना त्यांचेच घर उघडेना त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्यांना फोन केल्यानंतर चोरटयांनी त्यांच्या घराला लावलेली कडी काढण्यात आली तसेच शेजारच्या दोन्ही घरांच्या दारांच्या कड्या काढलेल्या दिसल्या,त्यांनी जवळ जाऊन पाहीले तर चोरट्यांनी घरे फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले . मनोहर खरमाळे यांनी गावच्या पोलिस पाटील वैशाली टेमगिरे यांना घटनेची माहीती दिली.

पोलिस पाटील वैशाली टेमगिरे यांनी मंचर पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली,पोलिस हवालदार नंदकुमार आढारी, एस .सी.भोईर, योगेश रोडे यांनी सकाळी घटनास्थळी घरांची पहाणी करून माहीती घेतली. चौकट: साक्षात पांडुरंगच धावला... जयराम खरमाळे यांच्या घरातील दोन कपाटे चोरटयांनी उचकटली पण काही सापडले नाही आणि तिसरे कपाट काही चोरट्यांना फोडता आले नाही आणि सोन्याचा ऐवज वाचला,या कपाटात असलेला सोन्याचा ऐवज वाचल्याने साक्षात पांडुरंगच धावला असल्याची चर्चा गाव परिसरात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT